अज्ञात निराधार वृध्द महिलेची हत्या

09 Jan 2026 18:32:59
वाशीम,
elderly woman murder शहरातील रेल्वे स्थानकाच्या निर्जन परिसरात एका ६० वर्षीय हतबल आणि निराधार वृद्ध महिलेची अज्ञातांनी निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज, ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. त्या निराधार अज्ञात महिलेवर अज्ञात नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. या घटनेने रेल्वेस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. दिवसभर भिक्षा मागून सदर महिला संध्याकाळी रेल्वे स्टेशन परिसरात आश्रयला जात असे.
 
 
 
निराधार
 
मात्र, तिला काय माहित की, आजची रात्र तिच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरेल? तिथे पडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि नशा करण्यासाठी वापरलेले अंमली पदार्थावरुन असे दिसून येते की, लिंगपिसाटांनी त्या निराधार महिलेचे लचके तोडले आहेत. साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या त्या वृद्धेच्या असहायतेचा फायदा घेऊन, नराधमांनी आधी तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिची क्रूरपणे हत्या केली.
वाशीम रेल्वे स्थानक परिसर गुन्हेगार व नशेखोरांचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या काळोखात हे नशाखोर नरभक्षक बनून निराधार वृद्धांना लक्ष्य करत आहेत, हे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच वाशीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.elderly woman murder रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो वृद्धेचा मृतदेह पाहून उपस्थित प्रत्येक जण हेलावून गेला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. सदर मृतक महिला कोण आणि तिची निर्घृण हत्या करणार्‍या आरोपींचा तपास लावणे पोलिसासमोर एक मोठे आव्हान आहे.
Powered By Sangraha 9.0