नागपूर
Electric Expo 2026 नागपूरसह संपूर्ण राज्यात विजेची मागणी सतत वाढत असताना सौर ऊर्जा एक चांगला पर्याय उपलब्ध वीजेची काही प्रमाणात भरपाई करण्यास मदत होत आहे. सध्याच्या घडीला नागपूरात १५००मेगावॅट वीजेची मागणी असून पुढील २ वर्षात पुन्हा ५०० मेगावॅट ऊर्जेची गरज निर्माण होणार असल्याने आतापासूनच नियोजन करावे लागणार असल्याची माहिती एमएसईडीसीएलचे संचालक (ऑपरेशन्स) सचिन तालेवार यांनी दिली.
द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात तीन दिवसीय विद्युत एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दिलीप डोडके, संभाजी माने, प्रदीप चामट, अनिल मानापुरे, प्रफुल्ल मोहोड,देवा ढोरे, अविनाश खैवाले, रमेश कनोजिया,हरिष गजभे आदी उपस्थित होते.
विद्युत उपकरणाच्या मागणीत ५० वाढ
सचिन तालेवार पुढे Electric Expo 2026 म्हणाले, विद्युत मागणी हाच प्रगतीचा खरा निर्देशांक असून पायाभूत सोयीसुविधा सक्षम करण्यासाठी नव्या सूचना, सुधारणा सुचवून सातत्याने संपर्कात राहावे लागणार आहे. नवीन शहर, नवे उद्योग, पायाभूत सुविधामुळे विद्युत उपकरणाची मागणी वाढली आहे. पारंपारिक आणि अपारंपारिक दर्जाची नवीन उपकरणे विद्युत एक्स्पोत असल्याने सुरक्षित उपकरणाची निवड करताना होणार आहे. या एक्स्पोत तंत्रज्ञानावरील चर्चासत्रे होणार असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धक माहिती मिळणार आहे.
संभाजी माने म्हणाले, इलेक्ट्रिकल उपकरणाची मागणी पूर्वी केवळ ९ ते १०टक्के होती, मात्र आता ४० ते ५० टक्के विद्युत उपकरणाच्या मागणीत वाढ झाली आहे. औष्णिक वीज केंद्रातील वीज पुरवठा मर्यादित असल्याने आता सौर ऊर्जाकडे वळण्याची नितांत निर्माण झाली आहे. सौर ऊर्जेच्या वापर करण्यात नागपूर शहर आघाडीवर असून देशभरात नागपूरचा तिसरा क्रमांक लागतो. पुढील काही वर्षात यात मोठी भर पडण्याची शक्यता आहे. नव्या घराची संख्या सतत वाढत असल्याने ज्याप्रमाणे अभियंते, कंत्राटदार, तंत्रज्ञ आणि विद्युत उपकरणाची मागणी सुध्दा वाढणार आहे.
विद्युत एक्स्पोत तांत्रिक सत्रे, उद्योग संवाद
कार्यक्रमाच्या अशोक तिजारे, मृण्मयी कुलकर्णी , प्रफुल मोहोड आदींनी परिश्रम घेतले. विद्युत एक्स्पोमध्ये ११० पेक्षा अधिक स्टॉल असून असून २ हजाराहून अधिक उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत. तांत्रिक सत्रे, उद्योग संवाद आणि नव्या संधींमुळे ‘विद्युत एक्स्पो २०२६’ हे विद्युत क्षेत्रातील कंत्राटदार, अभ्यासक, नवउद्योजक आणि विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरत आहे.