हिंदी विश्वविद्यापीठ गांधी विचारांचे वाहक : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

09 Jan 2026 17:12:43
वर्धा,
minister dharmendra pradhanहिंदी भाषेत ज्ञाननिर्मिती व प्रकाशनाची संकल्पना महात्मा गांधी यांच्या विचारांमधून देशाला दिशा देत आली आहे. हीच विचारपरंपरा पुढे नेत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करत आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमांद्वारे हिंदीला समृद्ध ज्ञानभाषा बनवण्यात विश्वविद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ऑनलाइन माध्यमातून दिलेल्या आपल्या सारस्वत संदेशात म्हणाले.
 

hindi vishva  
 
 
आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या वाचस्पती भवनाच्या प्रांगणात आयोजित स्थापना दिवस कार्यक्रमात ते संबोधित करत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. कुमूद शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’, सारस्वत अतिथी म्हणून कार्यपरिषद सदस्य व केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा येथील उपाध्यक्ष प्रा. सुरेंद्र दुबे, कुलसचिव कादर नवाज खान उपस्थित होते. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान पुढे म्हणाले की, सध्याच्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन विश्वविद्यापीठ हिंदीला प्रभावी तांत्रिक तसेच ज्ञान-विज्ञानाची भाषा म्हणून विकसित करण्यासाठी प्रशंसनीय प्रयत्न करत आहे. हिंदीबरोबरच इतर भारतीय व परदेशी भाषांमध्येही असे उपक्रम राबवावेत, जेणेकरून देशातील इतर विश्वविद्यालयांनाही प्रेरणा मिळेल. विकसित भारतच्या प्रवासाला ज्ञान, संस्कृती आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून बळकटी देण्यात विश्वविद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन संदेशात म्हणाले की, स्वदेशी व स्वावलंबनाबरोबरच आपल्याला भाषाही समृद्ध करणे आवश्यक आहे. गेल्या २९ वर्षांत विश्वविद्यापीठाने हिंदी भाषा व साहित्याच्या विकासासाठी दिलेले योगदान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे आहे. १९७५ साली नागपूर येथे झालेल्या पहिल्या विश्व हिंदी संमेलनाचा उल्लेख करत त्यांनी नागपूर व वर्धेची भूमी हिंदीसाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. हिंदीला जागतिक स्तरावर अधिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा संकल्प घेण्याचे आवाहनही ना. गडकरी यांनी यावेळी केले.
माजी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ म्हणाले की, विश्वविद्यापीठ हे ज्ञान व शांततेचे केंद्र असून मानवी प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.minister dharmendra pradhan ज्ञानाची धारा प्रत्येक व्यतीपर्यंत पोहोचली पाहिजे. देशाला आत्मनिर्भर व विकसित बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. येणार्‍या काळात हिंदी डिजिटल विश्वातही एक प्रमुख माध्यम बनेल. हिंदीत बोलणे, विचार करणे आणि सर्जन करणे हे राष्ट्रभती व राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी साधन आहे, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. कुमूद शर्मा यांनी, भारतीय पारंपरिक ज्ञानावर आधारित विश्वकोश निर्माण करण्याचा संकल्प व्यत केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. संचालन प्रा. ओमप्रकाश भारती तर कुलसचिव कादर नवाज खान यांनी आभार मानले. यावेळी नागरिक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0