हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री वाढविण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध

09 Jan 2026 20:02:43
 नागपूर
Nitin Gadkari ’उत्तर-पूर्वेकडील राज्यांमध्ये पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या कमालीने वाढली आहे. त्यामुळे केवळ उत्तर-पूर्वेकडील राज्यांसह इतर राज्यात सुध्दा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री वाढविण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत,’असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केले. हॉटेलकी प्लॅटफॉर्मने १५ हजारहून अधिक हॉटेल्स आणि १.५ दशलक्ष खोल्यांचे लक्ष्य गाठल्यानिमित्त येथील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल, हॉटेलकी प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष आदित्य त्यागराजन, आयएचजीच्या मुख्य उत्पादन व तंत्रज्ञान अधिकारी जॉली फ्लेमिंग, जी हॉस्पिटॅलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनल सिन्हा, रेडरूफ इनचे मुख्य कार्यकारी अधिकारी झॅक घरिब, अमेरिकेतील हॉटेल व्यावसायिक सॅम पटेल आदींची उपस्थिती होती.
 
 
 
Nitin Gadkari
अ‍ॅग्रो कन्व्हेन्शन सेंटरजवळ पंचतारांकीत हॉटेल
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, ’उत्तर-पूर्वेकडील राज्यांमध्ये गत १० ते १५ वर्षात चांगले सिमेंट रस्ते, पायाभूत सुविधा तयार झाल्याने फॅमिलीसह पर्यटन सुविधाजनक झाले आहे. त्यामुळेच महामार्गावरील हॉस्पिटॅलिटी क्षेत्र झपाटयाने वाढताना दिसून येत आहे. विदेशाप्रमाणे आता देशांतर्गत पर्यटन वाढण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांमध्ये अनेक संधी असल्याने विदेशी कंपण्यांकडून गुंतवणूक होत आहेत.’अमरावती मार्गावरील दाभा येथे अ‍ॅग्रो कन्व्हेन्शन सेंटरजवळ ४५० खोल्यांचे पंचतारांकीत हॉटेल तयार करण्यामागे पर्यटन हाच मुख्य हेतू माहिती त्यांनी यावेळी दिली.
धार्मिक पर्यटनात कमालीने वाढ
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रितेश अग्रवाल म्हणाले,‘गेल्या काही वर्षांमध्ये धार्मिक पर्यटन वाढले आहे. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमुळे केवळ प्रयागराज येथील अर्थव्यवस्था गतीमान झाली नव्हती. प्रयागराजसोबत वाराणसी, अयोध्या असे एक धार्मिक सर्किट तयार झाले होते. पुढील वर्षी नाशिक येथे कुंभमेळा होणार असून निमित्ताने लगतच्या प्रदेशात एक पर्यटन सर्किट तयार होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढणार आहे. धार्मिक पर्यटनाप्रमाणेच नागपूर नजीकच्या परिसरात असलेले जंगल आणि व्याघ्र प्रकल्पांमुळे हा परिसर ‘फॉरेस्ट टुरिझम’च्या दृष्टीने विकसित होत आहे. यामध्ये अधिक प्रगती करण्याच्या बर्‍याच संधी उपलब्ध आहेत. संपूर्ण देशभरात धार्मिक पर्यटन करणार्‍यांची संख्येत वाढ झाली आहे.नवीन वर्ष साजरे अनेकजण आता पर्यटन स्थळी फिरायला जाण्याचे नियोजन करतात. पूर्वीपेक्षा आता हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला मोठा वाव मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारने पर्यटन धोरण आणल्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठा लाभ होणार आहे.
विद्युत एक्सपोचे उद्घाटन डॉ. वसंतराव देशपांडे परिसर येथे शुक्रवार, ९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. या प्रसंगी एमएसईडीसीएलचे संचालक सचिन तालेवार, कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दिलीप डोडके, एस. डी. मनोहर पोटे, संभाजी माने उपस्थित राहणार आहे. विद्युत एक्स्पोत विद्युत उपकरणांचे प्रसिद्ध उत्पादक, आणि विक्रेते, तसेच विद्युत क्षेत्रातील तज्ञ सहभागी होणार आहे. पारंपारिक आणि अपारंपारिक दर्जाची नवीन उपकरणे विद्युत राहणार आहे. सुरक्षित तंत्रज्ञानावरील चर्चासत्रे होईल. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणारे अभियंते, कंत्राटदार, तंत्रज्ञ यात सहभागी होणार आहे. वीज संघटनांचे प्रतिनिधी आणि सदस्य यांच्यासह कंत्राटदार सुध्दा सहभागी होईल. सर्व अभियांत्रिकी विद्युत एक्स्पो मध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0