कीव,
Hypersonic missile attack on Ukraine रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालले आहे. नुकत्याच एका विनाशकारी हल्ल्यात रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वापर करून युक्रेनवर हल्ला केला, ज्यामुळे पोलंडजवळील एका युक्रेनियन शहराचे मोठे नुकसान झाले. रशियाचे ओर्शेनिक क्षेपणास्त्र हे त्यांच्या सर्वात प्राणघातक हायपरसोनिक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते.
हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा दहा पट वेगाने प्रवास करते आणि रोखणे जवळजवळ अशक्य आहे. त्याची श्रेणी ५,००० किलोमीटरपेक्षा जास्त असून याचा अर्थ रशिया संपूर्ण युरोपला लक्ष्य करू शकतो. हे प्राणघातक शस्त्र मोठ्या क्षेत्रात विनाश घडवू शकते आणि शहरांवर गंभीर परिणाम होतो. युक्रेनने ल्विव्ह शहराचे ताबा पुन्हा मिळवले असून, हल्ल्याच्या अगोदरच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मोठ्या हल्ल्याची शक्यता लक्षात आणून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले होते. झेलेन्स्की यांनी यासाठी व्हिडिओ संदेशाद्वारे सूचना दिल्या आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.