नवी दिल्ली,
india-post-gds-recruitment-2026 नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी! भारतीय डाक विभागात मेगा भरती सुरू असून तब्बल २५,००० पदे भरण्यात येणार आहेत. संचार मंत्रालयाने या भरतीसंदर्भात शेड्यूल जाहीर केले आहे. या भरतीची खासियत म्हणजे उमेदवार ऑनलाईन अर्ज करून थेट पोस्टवर नोकरी मिळवू शकतील.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख २० जानेवारी २०२६ आहे, तर अर्जाची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे. या भरतीत ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट पोस्ट मास्टर, डाक सेवक अशा विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. या भरतीची आणखी खास गोष्ट म्हणजे कोणत्याही परीक्षा शिवाय निवड केली जाणार आहे. १०वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. india-post-gds-recruitment-2026 अर्जदारांना गणित आणि स्थानिक भाषा यातील मूलभूत ज्ञान, संगणकाचे बेसिक ज्ञान आणि सायकल चालवता येणे आवश्यक आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी India Post GDS वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरण्याबरोबरच, कागदपत्रे अपलोड करावी, लागू असल्यास फी भरावी आणि अर्जाची प्रिंट काढून सबमिट करावी.
उमेदवारांची निवड दहावीच्या गुणांनुसार केली जाईल, त्यामुळे परीक्षेची आवश्यकता नाही. india-post-gds-recruitment-2026 केंद्र शासनाच्या नोकरीसाठी ही सुवर्णसंधी २० जानेवारी पासून सुरू होत असून, अर्जाची शेवटची तारीख लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अनेकांचे स्वप्न केंद्र शासनात नोकरी करण्याचे आहे, आता ते स्वप्न सत्यात उतरण्याची ही सुवर्णसंधी आहे.