लँड फॉर जॉब्स घोटाळ्या लालू कुटुंबाला धक्का...आरोप निश्चित

09 Jan 2026 11:05:08
पाटणा,
Land for Jobs scam लँड फॉर जॉब्स घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने संपूर्ण कुटुंबाविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणात लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मीसा भारती यांच्यासह मुलगा तेजप्रताप यादव, मुलगा तेजस्वी यादव आणि मुलगी हेमा यांच्यावरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, या प्रकरणातील ९८ आरोपींपैकी ५२ जणांना निर्दोष ठरवण्यात आले आहे.
 
 
lalu yadav
 
लँड फॉर जॉब्स घोटाळा हा कथित भ्रष्टाचाराचा खटला आहे. २००४ ते २००९ दरम्यान लालू प्रसाद यादव केंद्रीय रेल्वे मंत्री असताना हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांनी रेल्वे मंत्रीपदाचा गैरवापर करून ग्रुप डी पदांवर नियुक्त्या केल्याचे सांगितले जाते. या नियुक्त्यांच्या बदल्यात लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारांकडून सवलतीच्या दरात किंवा भेटवस्तू म्हणून जमीन घेतल्याचा आरोप न्यायालयात आहे.
Powered By Sangraha 9.0