निवडणुकपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; मोठ्या नेत्यावर थेट ईडीची छापेमारी

09 Jan 2026 13:58:23
नागपूर,  
nagpur-ed-raid राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राजकीय वातावरण तापले आहे. प्रत्येक पक्ष महापालिकेतील सत्तेसाठी जोरदार प्रयत्न करत असून त्यासाठी नवनवीन युती-आघाड्या केल्या जात आहेत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. काही नेते जाहीर सभांचा सपाटा लावत आहेत, तर काही जण शाखा व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधत आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाले आहे.
 
nagpur-ed-raid
 
अशा परिस्थितीत ठाकरे गटाला धक्का देणारी घटना समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नागपूर जिल्हाध्यक्षांच्या घर व कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात सकाळपासूनच ईडीची मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू आहे. पहाटे पाच वाजल्यापासून नागपूर आणि दिल्लीहून आलेल्या ईडीच्या सुमारे दहा पथकांनी विविध ठिकाणी एकाचवेळी कारवाई सुरू केली. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात रेती विक्रीदरम्यान झालेल्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित २०२१ मधील प्रकरणात ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या तोंडावरच ही छापेमारी झाल्याने कारवाईच्या वेळेबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मतदारांमध्येही वेगवेगळ्या तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. nagpur-ed-raid या कारवाईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्यासह अनेकांच्या घर व कार्यालयांची झडती घेण्यात आली आहे. सावनेरमध्ये प्रफुल्ल कापसे, उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते आणि दादू कोलते यांच्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. पाटणसावंगी येथे शरद राय आणि मनोज गायकवाड, तर खापा येथे अमित राय यांच्या घर-कार्यालयांवरही ईडीने कारवाई केली आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे पक्षाची चिंता वाढली आहे. nagpur-ed-raid पुढील काळात ईडीकडून या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, जर मोठी कारवाई झाली तर तो ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0