नागपूर भाजपा तेलुगु सेलची नवीन टीम जाहीर

09 Jan 2026 13:07:22
नागपूर,
Nagpur BJP भारतीय जनता पार्टी तेलुगु सेल, नागपूर शहर यांच्या वतीने रविवारी आंध्र असोसिएशन लायब्ररी हॉल, नॉर्थ अंबाझरी रोड येथे कार्यकर्ता स्नेहमिलन व कार्यकारिणी घोषणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर तसेच भाजपा नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी (रामटेक) आणि सुनील मित्रा यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे मार्गदर्शन तेलुगु सेलचे संरक्षक पी.एस.एन. मूर्ती यांनी केले.
 
Nagpur BJP
 
यावेळी भाजपा तेलुगु सेल, नागपूर शहरची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी किलारी सूरी बाबू यांची नियुक्ती करण्यात आली. महामंत्रीपदी प्रकाश मातंगी, सुनील मुन्नेलाल, के.व्ही. श्रीनिवास, प्रकाश राव (गुंडू) आणि टाटा विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. Nagpur BJP संघटन मंत्री म्हणून मंडा नागेश्वर राव यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. मीडिया प्रभारी म्हणून ए. श्रीधर राव, तर उपमीडिया प्रभारी म्हणून चंद्रशेखर वुंडी यांची नियुक्ती करण्यात आली.
 
यासोबतच मंडल संयोजकांचीही घोषणा करण्यात आली.
दक्षिण-पश्चिम नागपूर– कपिल नायडू,
पश्चिम नागपूर– करण राव,
उत्तर नागपूर– हरि कृष्ण नायडू,
दक्षिण नागपूर– पायल शिवकुमार नायडू,
पूर्व नागपूर– नारायण पोट्टी,
मध्य नागपूर– वाय. व्ही. राजलक्ष्मी राव
यांची मंडल संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटना अधिक मजबूत करण्याचे आणि पक्षाच्या धोरणांचा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रभावीपणे प्रसार करण्याचे आवाहन केले. Nagpur BJP कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला.
 
सौजन्य: प्रवीण डबली, संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0