आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळात नववर्ष साजरे

09 Jan 2026 18:14:05
नागपूर,
Senior Citizens आदर्श ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, दुर्गानगरतर्फे नूतन वर्षाभिनंदन संगितमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मेघा देशमुख यांच्या स्वरांजली ग्रुपच्या गायक कलाकारांनी हिंदी व मराठी गीतांचा सुरेल आणि बहरदार नजराणा सादर केला.
 
nagpur
 
कार्यक्रमात फेसकॉम पूर्व विदर्भ विभाग, नागपूरचे अध्यक्ष जितेंद्र भोयर आणि त्यांची टीम उपस्थित होती. सर्व पाहुण्यांचे शाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. Senior Citizens कार्यक्रमाचा समारोप स्वादिष्ट भोजनाने करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश भातकुले, सचिव राजू खानोरकर, कोषाध्यक्ष श्रीराम अनासाने आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सौजन्य: श्रीराम दुरूगकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0