अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून

09 Jan 2026 21:01:23
नवी दिल्ली,
Parliament Budget Session 2026, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ यावर्षी २८ जानेवारीपासून २ एप्रिल २०२६ पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या शिफारशीवर माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेतल्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन बोलावण्यास मंजुरी दिली आहे.
 

Parliament Budget Session 2026, 
या अधिवेशनाचा पहिला टप्पा २८ जानेवारीपासून सुरू होऊन १३ फेब्रुवारी २०२६ रोजी संपणार आहे. त्यानंतर संसदेचे कामकाज काही काळासाठी स्थगित राहील. दुसरा टप्पा ९ मार्च २०२६ रोजी पुन्हा सुरू होईल आणि संपूर्ण अधिवेशन २ एप्रिल २०२६ रोजी समाप्त होईल.
 
 
अर्थसंकल्पीय Parliament Budget Session 2026, अधिवेशन हे संसदेच्या वार्षिक कामकाजातील सर्वांत महत्त्वाचे अधिवेशन मानले जाते. या काळात केंद्र सरकारकडून आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. यासोबतच आर्थिक धोरणांवर चर्चा, विविध महत्त्वाच्या विधेयकांचे सादरीकरण आणि त्यावर सखोल चर्चा होणार आहे.सरकारच्या दृष्टीने हे अधिवेशन जनतेशी निगडित मुद्द्यांवर चर्चा करण्याची आणि विकासाभिमुख निर्णय घेण्याची संधी ठरणार आहे. तसेच विरोधकांकडूनही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर सरकारला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. संसदेतील सखोल व अर्थपूर्ण चर्चेमुळे लोकशाही प्रक्रियेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.एकूणच, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ हे देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय दिशेला आकार देणारे महत्त्वाचे अधिवेशन ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0