तभा वृत्तसेवा आर्णी,
Kumar Chinta कायदा पाळणाèया नागरिकांसाठी पोलिस नेहमीच मदतीला धावून येतात, मात्र समाजात अशांतता माजवणाèया आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढविणाèयांसाठी पोलिस कठोर भूमिका घेतात, असे स्पष्ट प्रतिपादन पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले.
ते आर्णी तालुक्यातील बोरगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, शिक्षण हे आयुष्यातील सर्वात मोठे शस्त्र आहे. मुलींनी आत्मविश्वासाने शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. समाजात सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे, असे सांगितले. बोरगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात यवतमाळ पोलिस दलातर्फे दोन दिवस विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रगती व्यवहारे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून तेजस सारडा, दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश चवरे, डॉ. वृक्षाली माने, आर्णीचे ठाणेदार नीलेश सुरडकर, दामिनी सेल प्रमुख दीपमाला भेंडे व जिल्हा पोलिस अधीक्षक जनसंपर्क अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी गुल्हाने उपस्थित होत्या.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाची विद्यार्थिनी चैताली जाधवचा कराटेमध्ये सुवर्णपदक तसेच एशियन गेम्समध्ये निवड झाल्याबद्दल कुमार चिंता यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच घाटंजी येथील गृहरक्षक आकाश ठाकरे यांनी समयसूचकता व प्रसंगावधान दाखवून एका निरागस मुलाचा जीव वाचल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.सायबर सुरक्षा, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, मानवी तस्करी तसेच कायदेविषयक माहिती देण्यात आली. सध्याच्या काळात सायबर गुन्हे वाढत असून अनोळखी कॉल, लिंक व समाज माध्यमावरील फसवणुकीपासून दूर राहवे. विद्यार्थिनींना कोणतीही अडचण किंवा अन्याय झाल्यास घाबरून न जाता त्वरित पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, पोलिस विभाग सदैव तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वासही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन पीबी धुमाळ यांनी केले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.