Senior citizen, problem ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची ग्वाही सर्वपक्षीय व अपक्ष उमेदवारांनी दिली. ज्येष्ठ ना. महामंडळ विदर्भ यांच्या वतीने आयोजित परिसंवादात विकसित नागपूर व ज्येष्ठांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. पदपथ अतिक्रमणमुक्त करणे, २४x७ पाणीपुरवठा, खड्डेमुक्त रस्ते, विरंगुळा केंद्रे व आरोग्य सुविधा यांवर विशेष लक्ष देण्याचा संकल्प उमेदवारांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला चंद्रकांत खंगार, मंगला मस्के, गणेश चारलेवार, मानसी सिमले, अजय खळतकर, सारिका नांदुरकर, सतीश होले, कल्पना भावसार, स्नेहल बिहारी, शिवानी चौधरी, ज्योती देवघरे, योगेश मडावी, अजय बोढारे, अमोल श्यामकुळे, माया हाडे, ईश्वर ढेंगळे, कृतिका आकरे आदी उपस्थित होते. Senior citizen, problem कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास शिंदे यांनी केले. सचिव अॅड. अविनाश तेलंग यांनी पार्श्वभूमी मांडत शंभर टक्के मतदान हे लोकशाहीच्या यशाची हमी असल्याचे सांगितले. अध्यक्ष प्रा. प्रभुजी देशपांडे यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. डॉ. अरविंद शेंडे यांच्या आभारप्रदर्शनाने व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजाभाऊ अंबारे, उल्हास शिंदे, वानकर, वसंत बोकडे, प्रकाश मिरकुटे, रामदास ठवकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:विनोद व्यवहारे,संपर्क मित्र