वडकीत शुभ लाभ अर्बन वुमन्स क्रेडिट सोसायटी शाखेचे उद्घाटन

09 Jan 2026 18:16:12
तभा वृत्तसेवा
Shubhlabh Urban Womens Credit Society, राळेगाव, शुभ लाभ अर्बन वुमन्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा 4 जानेवारी रोजी पार पडला.या नवीन शाखेचे उद्घाटन माजी सरपंच डॉ. नरेंद्र इंगोले यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश देशमुख, दिलीप कांडूरवार, जगदीश पारखी, उमेश घेई, गोपाल सांगानी यांची उपस्थिती होती.
 
 
 Shubhlabh Urban Womens Credit Society
या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून शुभ लाभ अर्बन वुमन्स क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या नवीन शाखेचा शुभारंभ केला.उद्घाटन प्रसंगी डॉ. नरेंद्र इंगोले यांनी नागरिकांशी संवाद साधताना अशा संस्थांच्या माध्यमातून स्थानिक महिला किंवा नागरिकांना आर्थिक बचतीची सवय लागून त्यांना कर्जसुविधांचा लाभ घेता येईल आणि त्यांच्या हातात आर्थिक निर्णयक्षमता येईल. आगामी काळात वडकी शहराच्या एकूणच प्रगतीसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रकाश देशमुख यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
 
संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी संचालन अर्पिता वैरागडे यांनी केले. गीत गायन मनीषा गायकवाड व सोफिया शेख यांनी केले.यावेळी शुभ लाभ अर्बन वुमन्स क्रेडिट को-ऑप सोसायटीचे आशिष सायंकार, नयना सायंकार, बँकेचे व्यवस्थापक नरहरी थूल, प्रमोद कडसे, शाहरुख पठाण, बँकेचे प्रतिनिधी पंकज सांगानी, मोहित सांगानी, नितेश येलगुंडे, कान्हा अवचट, पीयूष खोठाले, तुषार हिवरकर, शुभम फुटाणे, विशाल कुडमते, श्याम सावंत, अभय विरुळकर, अश्विनी खडसे, धम्मदिनी मून, सीमा काळे, राजश्री बोधने, शिल्पा वागडेसह नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0