विहिरीत पडलेल्या अस्वलाला वनविभागाने केले रेस्यू

09 Jan 2026 19:45:30
मोताळा,
rescued bear बुलढाणा जिल्हयातील मोताळा तालुयातून एक थरारक घटना समोर आली आहे. विहिरीत पडलेल्या एका मादी अस्वलाला तब्बल २८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे. मोताळा वनपरिक्षेत्रातील तारापूर येथे गजानन रबडे यांच्या शेतातील विहिरीत चक्क एक मादी अस्वल पडल्याचे समोर आले. ही बातमी वार्‍यासारखी पसरली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 

rescue 
 
घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी तात्काळ यंत्रणेला आदेश दिले आणि अस्वलाच्या रेस्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. सलग २८ तास हे ऑपरेशन सुरू होते. अखेर ८ जानेवारीला दुपारी १ वाजता त्या अस्वलाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अस्वलाला बुलढाण्यातील राणी बागेत आणले गेले, जिथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉटर मेटागळे यांनी तिची प्राथमिक तपासणी केली. सुदैवाने मादी अस्वल पूर्णपणे सुदृढ असल्याने, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली तिला अंबाबरवा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.rescued bear ही यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक सरोज गवस, वनपरिक्षेत्र अधिकारी पडवळ आणि पंकज आळसपुरे यांच्या नेतृत्वाखाली संदीप माडवी, बाळासाहेब घुगे, पवन वाघ आणि त्यांच्या टीमने पार पाडली.
Powered By Sangraha 9.0