पीडित शेतकरी रोशन कुळे यांच्या घरी पालकमंत्र्यांची भेट

09 Jan 2026 20:25:28
नागभीड,
farmer roshan kule तालुक्यातील मिंथूर येथील सावकार पीडित शेतकरी रोशन शिवदास कुळे यांचे सांत्वन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी त्यांच्या घरी भेट दिली. यावेळी आमदार बंटी भांगडिया, जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती. पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी सावकारांकडून घेतलेल्या 1 लाख रुपयांवर अव्वाच्या सव्वा व्याजदर लावून तब्बल 74 लाख रुपये सावकारांनी वसूल केले. या कर्जाच्या परतफेडीसाठी कुळे यांना विविध वाहनांसह स्वतःची किडनीही विकावी लागल्याने हे प्रकरण देशपातळीवर चर्चेत आले. त्याचा तपास सुरू आहे.farmer roshan kule तर सावकार कारागृहात आहेत. या सहा सावकारांची जामीन रद्द झाली आहे. दरम्यान, 3 जानेवारी रोजी प्रहारचे बच्चू कडू आणि शेतकरी नेते वामन चटप यांच्या नेतृत्वात मिंंथूर ते नागभीड असा आक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता.
 

uike 
 
 
या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार बंटी भांगडिया व जिल्हाधिकारी गौडा यांनी रोशन कुळे यांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
रामकृष्ण सुंचूच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
चंद्रपूरः पोलिसांच्या अटकेत असलेला किडनी रॅकेटचा मुख्य दलाल ‘डॉ. कृष्णा’ उर्फ रामकृष्ण सुंचू याने जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर येत्या सोमवारी, 12 जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कुळे यांची संपत्ती परत मिळवून दिली जाईलः डॉ. उईके
रोशन कुळे यांची सावकारांच्या घश्यात गेलेली संपत्ती सरकारमार्फत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन डॉ. अशोक ऊईके यांनी दिले.
मला न्याय मिळत आहे, कुणीही राजकारण करू नयेः कुळे
प्रशासन गतीने काम करीत आहे. मला प्रशासनाकडून योग्य तो न्याय मिळत आहे. त्यामुळे मी समाधानी आहे. यामध्ये कुणी राजकारण करु नये. हा राजकारणाचा भाग नाही, माझ्या जिवनाचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया रोशन कुळे यांनी यावेळी दिली.
Powered By Sangraha 9.0