slaughter cow गोहत्या बंदीचा कायदा असतानाही मास विक्रीसाठी गाईची कत्तल करणाऱ्या 3 कारधा पोलिसांनी अटक केली आहे. या तीनही आरोपींची पोलिसांनी शहरातून धिंड काढली. गो तस्करी आणि गोहत्येच्या अनेक घटना जिल्ह्यात घडत असतात. मात्र पहिल्यांदा या घटनेतील आरोपींची धिंड काढून पोलिसांनी गोहत्या करणाऱ्यांना मोठा इशारा दिला दिला आहे.
कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारधा झोपडपट्टीच्या मागे गायीची कत्तल केली जात असल्याची माहिती कारधा पोलिसांना 8 रोजी रात्री मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता दोन जण गायीची कत्तल करताना आढळून आले. अजीम कुरेशी सौदागर मोहल्ला भंडारा याच्या सांगण्यावरून ही कत्तल केली जात असल्याचे अजमल शेख आणि परवेज पठाण यांनी सांगितले. या दोघांसह आजीम कुरेशी यालाही अटक करण्यात आली. तिनही आरोपीच्या विरोधात भादवी आणि प्राणी क्रूरता कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आज या तीनही आरोपीना कारधा पोलिसांनी भंडारा शहरातून पायी फिरवीत धिंड काढली.