‘त्या’ वाघांना जेरबंद करण्याची रणनिती आखली, उपवनसंरक्षकांकडून आढावा

09 Jan 2026 17:00:24
समुद्रपूर,
deputy conservator of forests तालुक्यातील गिरड-खुर्सापार परिसरात गेल्या वर्षभर्‍यापासून वास्तव्यास असलेल्या एक वाघीण, तीन पिल्लं आणि एक वाघ अशा ५ वाघांच्या कुटुंबीयांच्या मुत संचारामुळे शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये दहशत आहे. आ. समीर कुणावार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सततच्या आग्रही मागणीमुळे वाघांना जेरबंद करण्याचे आदेश प्राप्त झाले असून वनविभाग आता अ‍ॅशन मोडवर आला आहे. वाघाला जेरबंद करण्याची रणनिती आखली जात असून उपवनसंरक्षक हरवीर सिंह, सहाय्यक वनसंरक्षक हरिलाल सरोदे यांनी खुर्सापार जंगलाला भेट देऊन वाघांना पकडण्यासाठी अधिकार्‍यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

टायगर
उपवनसंरक्षक हरवीर सिंह, सहाय्यक वनसंरक्षक हरिलाल सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात या वाघांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाची चमू युद्ध पातळीवर काम करीत आहे. जंगल परिसरात शेकडो ट्रॅप कॅमेर्‍यांसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. २ ड्रोन कॅमेरे सुद्धा दररोज घिरट्या घालत आहे. ६०च्यावर अधिकारी व कर्मचारी वाघांच्या मागावर असून या ५ वाघांना जेरबंद करण्यासाठी रणनिती आखली असून युद्ध पातळीवर वाघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे, त्यातील कुटुंब प्रमुख वाघाला जेरबंद करण्याची परवानगी ३ महिन्यांपूर्वीच मिळाली आहे. हा वाघ तीन महिने लोटूनही वनविभागाच्या हाती लागला नाही. त्यामुळे नागपूर व वर्धा वनविभागाला संयुत मिशन राबविण्याचे आदेश मिळाले होते. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे वनमंत्री गणेश नाईक, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत आमदार कुणावार यांनी गिरड परिसरातील वाघांचा मुद्दा उपस्थित करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली होती. वाघ नागपूर जिल्ह्यातील जंगलात पलायन करीत आहे.deputy conservator of forests यामुळे वर्धा जिल्ह्यातील वाघाला नागपूर हद्दीत पकडण्याचा कायदेशीर पेच निर्माण झाला होता. मात्र, आ. कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे नागपूर व वर्धा जिल्ह्यातील वनविभागाच्या चमूने संयुत कारवाई करण्याचा तोडगा काढण्यात आला होता. दोन्ही चमूचे काम सुरू असताना आता पाचही वाघांना जेरबंद करण्याच्या सूचना धडकल्या. त्यामुळे आता वाघासह कुटुंबीयांना जेरबंद करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी अ‍ॅशन मोडवर आले आहे. दरम्यान, उपवनसंरक्षक हरवीर सिंह, सहाय्यक वनसंरक्षक हरिलाल सरोदे यांनी खुर्सापार जंगलाला भेट देऊन आढावा घेत अधिकार्‍यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0