ब्रिटनमध्ये सोशल मीडिया ‘एक्स’वर बंदी?

09 Jan 2026 12:32:16
लंडन,
X is banned in Britain ब्रिटनमध्ये लोकप्रिय सोशल मीडिया अॅप ‘एक्स’वर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वादाचे केंद्रबिंदू आहे एक्सचा 'एआय चॅटबॉट ‘ग्रोक' ज्याद्वारे तयार हिणाऱ्या महिला आणि मुलांचे अश्लील फोटो. जगभरात अंदाजे ६५० दशलक्ष वापरकर्ते असलेले हे अॅप ब्रिटनमध्ये खूप लोकप्रिय आहे. टेलिग्राफच्या अहवालानुसार, ग्रोकचा वापर करून बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिमा तयार केल्या जात असल्याचे निदर्शनास आले. या वृत्तानंतर ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी ऑफकॉमला या प्रकरणात सर्व पर्यायांचा विचार करण्याची विनंती केली. १० डाउनिंग स्ट्रीटमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन सुरक्षा कायद्याअंतर्गत अब्जावधी पौंडांचा दंड आकारणे किंवा ब्रिटनमध्ये एक्सचा प्रवेश पूर्णपणे बंदी घालणे हे अधिकार ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे आहेत.
 
 
X is banned in Britain
 
ब्रिटिश इंटरनेट देखरेख संस्थेच्या अहवालानुसार, ग्रोक वापरून तयार झालेल्या प्रतिमा डार्क वेब फोरमवर शेअर केल्या गेल्या आहेत, ज्या बेकायदेशीर बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या श्रेणीत येतात. केयर स्टारमर यांनी या संदर्भात स्पष्ट मत व्यक्त केले, “हे चुकीचे आहे. हे बेकायदेशीर आहे. आम्ही हे सहन करणार नाही. मी सर्व पर्यायांचा विचार करण्याची विनंती केली आहे.” त्यांनी एक्सला गंभीरपणे घेण्याचे निर्देश दिले आणि ऑफकॉमला या प्रकरणात कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.
दुसरीकडे, एलन मस्क यांनी ब्रिटनच्या ऑनलाइन सुरक्षा कायद्यावर टीका केली आहे. त्यांनी दावा केला की या कायद्याचा उद्देश लोकांना दडपून टाकणे आहे. कायद्याअंतर्गत ब्रिटिश अधिकारी अशा सोशल मीडिया साइट्सवर प्रवेश रोखू शकतात, जे वारंवार बेकायदेशीर प्रतिमा, जसे की बाल लैंगिक शोषण सामग्री किंवा सूड पोर्नोग्राफी, हटवण्यात अपयशी ठरतात. ब्रिटनमध्ये एक्सवरील बंदी आणि या प्रकरणातील वाद अजूनही सुरू असून, भविष्यात काय निर्णय होईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.
Powered By Sangraha 9.0