नागपूर,
Police Commemoration Day पोलीस स्मृतिदिनानिमित्त काटोल रोड पोलीस मुख्यालयात शहीद पोलीस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे आणि कर्तव्यनिष्ठेचे यावेळी स्मरण करण्यात आले.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथे चिनी सैन्याच्या हल्ल्यात सीआरपीएफच्या १० जवानांना वीरमरण आले होते. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन पाळला जातो.या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किल्लोर अध्यक्षस्थानी उपस्थित होते. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक डॉ. दीपक शेंडेकर, डॉ. मिलिंद वाचनेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शहीद जवानांना श्रद्धासुमने अर्पण करून त्यांच्या राष्ट्रसेवेप्रती असलेल्या निष्ठेला विनम्र अभिवादन केले.
सौजन्य:दीपक शेंडेकर,संपर्क मित्र