कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार: संजय गाते

सकल कुंभार समाज विकास परिषद

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
वर्धा,
maharashtra-kumbhar-mati-kala-boardमहाराष्ट्रातील कुंभार समाजासाठी भाजपा सरकार लवकरच श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका माती कला बोर्ड कार्यान्वित करून कुंभार समाजाला न्याय देईल, असा विश्वास सकल कुंभार समाज विकास परिषदेचे प्रांताध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी व्यक्त केला. मंगळवार २७ रोजी येथील हरिराम टॉवर, मुरारका लॉन्स येथे सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.
 

sangay gate 
राज्य सरकारने कुंभार समाजासाठी ७०० ब्रास रॉयल्टी माफीचे परिपत्रक जारी केल्यामुळे कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला नवी ऊर्जा मिळाली आहे. आगामी काळातही मातीकला बोर्डाबरोबरच ग्रामीण भागातील कुंभार व्यावसायिकांना माफक दरात इंधन उपलब्ध करून देण्याचा, तेर या तिर्थक्षेत्राचा विकास आराखड्याचा, राज्यातील पारंपरिक व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा असे अनेक प्रश्न सरकार लवकरच सोडवणार असल्याचा पुनरुच्चार करून सकल कुंभार समाज विकास परिषदेअंतर्गत समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही गाते यांनी सांगितले.
 
 
या बैठकीत सकल परिषदेअंतर्गत १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आळा फाटा, पुणे येथे राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकत्र्यांची बैठक आयोजित केली असल्याचे सांगून सदर बैठकीचे नियोजन, त्यात चर्चिले जाणारे विषयी, आगामी कार्यक्रम, संघटना बांधणी आदी विषयांवर सांगोपांग चर्चा झाली. प्रास्ताविकातून सरचिटणीस सुभाष तेटवार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि आगामी काळातील परिषदेची वाटचाल याविषयी माहिती दिली.
 
कार्यक्रमासाठी प्रदेश सघंटक ओमप्रकाश पांडे, प्रदेश कोषाध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेश सचिव रमेश बुरबांदे, राकेश प्रजापती, दिलीप खांडेकर, प्रेम कारेगावकर, बबन लोणारे, संजय वाडकर, गणपत शेवाळकर, पुंडलिक रांजणे, एकनाथ बुरबांदे, भोजराज चौधरी, भीमराव डेरे, बबलू जुगेले, राजीव खरे, राजाभाऊ सोनेने, अमर बोरसरे, गंगाधर खांदारे, संजय बोरसरे, गणेश मोरे, अतुल वाडकर, कृष्णराव बोरसरे, विजय प्रजापती, आकाश संत्रे, अशोक सोनेने, अॅड, सागर मंचलवार, संतोष कनोजे, सचिन इंगळे, चेतन बुरबांदे, आदींसह राज्यातील प्रमुख पदाधिकारी, अनेक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.