अंशुलाच्या पहिल्या करवा चौथची बॉलिवूडमध्ये चर्चा!

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
मुंबई,
anshulas-first-karwa-chauth बॉलिवूडमध्ये करवा चौथचा उत्साह पाहायला मिळत असून, अभिनेत्री आणि सेलिब्रिटींनी पारंपरिक वेशभूषेत या सणाचा आनंद साजरा केला. सुनिता कपूर यांनी आयोजित केलेल्या करवा चौथच्या खास सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अंशुला कपूरने. कारण लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच करवा चौथ होता.
 
anshulas-first-karwa-chauth
 
बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण असलेल्या अंशुलाने यावर्षी रोहन ठक्करशी विवाह केला. त्यामुळे यंदाचा करवा चौथ तिच्यासाठी विशेष ठरला. या सोहळ्यासाठी तिने सोनेरी नक्षीकाम असलेला गुलाबी आणि लाल रंगाचा स्लीव्हलेस पारंपरिक पोशाख परिधान केला होता. मॅचिंग घरारा आणि भरतकाम केलेल्या पोटलीमुळे तिच्या लूकमध्ये आणखी आकर्षक भर पडली. या खास क्षणांची झलक तिने सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली.
 
या कार्यक्रमाला महीप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी यांनीही हजेरी लावली. तिघींनीही पारंपरिक पोशाखांमधून आपली खास शैली दाखवली. महीप कपूरने गडद लाल रंगाचा भरतकाम केलेला पोशाख परिधान केला होता. बांधणीच्या छटेतील प्रिंट्स आणि आकर्षक दागिन्यांनी तिचा लूक उठून दिसत होता. भावना पांडे पिवळ्या आणि केशरी रंगाच्या नक्षीकाम केलेल्या सूटमध्ये दिसली, तर नीलम कोठारीने हिरव्या रंगाच्या पारंपरिक पोशाखाला पसंती दिली. या तिघींच्याही हातात पूजेची थाळी पाहायला मिळाली.
 
या सोहळ्यात रिद्धिमा कपूर साहनी, गीता बसरा, मिनी माथूर आणि जान्हवी देसाई धवन यांनीही आपल्या उपस्थितीने रंगत आणली. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात दिसली, तर गीता बसराने गुलाबी रंगाचा शरारा सूट परिधान केला होता. मिनी माथूर लाल साडीत आकर्षक दिसत होती. जान्हवी देसाई धवनने किरमिजी रंगाच्या रफल साडीची निवड केली होती.
 
अभिनेता वरुण धवनची पत्नी नताशा दलाल फिकट गुलाबी रंगाच्या सॅटिन पोशाखात या कार्यक्रमाला पोहोचली. भरतकाम केलेला टॉप, वाइड लेग ट्राउझर्स, दुपट्टा आणि मांगटिक्यामुळे तिचा लूक विशेष ठरला. तर ताहिरा कश्यपने लाल रंगाची साडी परिधान करून सोहळ्याची शोभा वाढवली. पारंपरिक पेहराव आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे सुनिता कपूर यांचा करवा चौथ सोहळा विशेष चर्चेत राहिला.