प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या तरुणीचा विनयभंग

- आईच्या तक्रारीवरून युवकावर गुन्हा दाखल

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
molestation मैत्री झाल्यानंतर तरुणीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी युवकाने बळजबरी केली. तिने नकार दिल्यानंतर तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी अश्लील चाळे केले. प्रतिसाद मिळत नसल्याने धमकावल्याच्या आरोपावरून बेलतरोडी पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शेखर राजेंद्र नागभिडे (रा. नरेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

molestation 
 
 
तक्रारीनुसार, आरोपीची पीडित १७ वर्षीय मुलीशी ओळख होती. तो मुलीला भेटल्यानंतर तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. तसेच तिच्याकडे एकटक पाहणे आणि तिचा पाठलाग करणे, असे प्रकार करीत असल्याचा आरोप आहे. मात्र, मुलीने त्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आरोपीने मुलीला शिवीगाळ केली आणि धमकावले, असे तक्रारीत नमूद आहे.molestation स्वतःला इजा करून घेण्याची धमकी देतानाच मुलीला अडचणीत आणण्याची किंवा तिची फसवणूक करण्याची धमकीही त्याने दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.