नोव्हेंबर २०२६ या नव्या महिन्याची सुरुवात उद्यापासून होत असून, ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यातील ग्रहांच्या स्थितीतील बदल काही राशींसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः वृषभ, मिथुन, तूळ आणि मकर या चार राशींना या कालावधीत आर्थिक लाभासह करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. ६ नोव्हेंबर रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर १२ नोव्हेंबरला मंगळ सिंह राशीत संक्रमण करेल. १६ नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून, त्यानंतर शुक्र पुन्हा संक्रमण करून तूळ राशीत दाखल होईल. या ग्रहस्थितीचा चार राशींवर सकारात्मक प्रभाव पडण्याचे संकेत ज्योतिषशास्त्रातून व्यक्त करण्यात आले आहेत.

- वृषभ राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर महिना आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने लाभदायक ठरू शकतो. या काळात करिअरमध्ये प्रगती होण्यासोबतच धनप्राप्तीचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल आणि कुटुंबातील वातावरणही आनंदी राहण्याची शक्यता आहे. वादविवादांपासून दूर राहिल्याने मनःशांती मिळेल.
- मिथुन राशीच्या व्यक्तींनाही या महिन्यात आर्थिक आघाडीवर चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची संधी असून उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल; मात्र परदेशात जाण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते.
- तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नोव्हेंबरचा काळ विशेष अनुकूल मानला जात आहे. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळण्यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, धार्मिक प्रवासाचे योग जुळतील आणि मुलांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
- मकर राशीच्या व्यक्तींसाठीही नोव्हेंबर महिना महत्त्वपूर्ण ठरू शकतो. या काळात आत्मविश्वास, धाडस आणि काम करण्याची क्षमता वाढण्याचे संकेत आहेत. आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्थिरता कायम राहण्याची शक्यता असून, वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. याशिवाय परदेश प्रवासाची संधीही चालून येण्याचे संकेत आहेत.