छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar Accident छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात जळकी बाजार फाट्याजवळ भीषण अपघात घडला. रस्त्यावर पंक्चर झाल्याने उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत संदीप शामधन मंडावत आणि सचिन नंदू जामुंदे यांचा मृत्यू झाला. तर विकास भीमराव कपाटे आणि प्रशांत व्यंदेशकर हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, Chhatrapati Sambhajinagar Accident मिस्त्रीकाम आटोपून हे चौघे जण जाळीचा देव येथे परतत होते. त्याचवेळी सायंकाळी जळकी बाजार फाट्याजवळ हा अपघात घडला. रस्त्यावर पंक्चर झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा दुचाकीस्वारांना अंदाज न आल्याने ही धडक झाल्याचे सांगितले जात आहे.