‘लव्हला खोटी कमिटमेंट दिली असेल तर तुमच्यापेक्षा नीच कोणी नाही’

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
मुंबई
Scout OP and Love Gill ‘बिग बॉस २०’च्या घरात मैत्री आणि प्रेमाच्या नात्यावरून पुन्हा एकदा मोठा वाद रंगताना दिसणार आहे. यंदाच्या ‘वीकेंड का वार’मध्ये अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान स्पर्धकांची चांगलीच शाळा घेणार आहे. यावेळी सलमानच्या निशाण्यावर गेमर स्काऊट ओपी अर्थात तन्मय सिंग असून, लव्ह गिलसोबतच्या त्याच्या वाढत्या जवळिकीवरून सलमानने त्याला धारेवर धरले आहे. विशेष म्हणजे, गर्लफ्रेंड काश्वी हिरानंदानी हिच्यासमोर लव्हची बाजू न घेतल्याबद्दलही सलमानने स्काऊटला जाब विचारला. या संपूर्ण प्रकरणामुळे घरातील मैत्री, प्रेम आणि नात्यांमधील मर्यादांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
 

Salman Khan Slams Scout OP and Love Gill in Bigg Boss 20; Questions Their Relationship on Weekend Ka Vaar 
सलमान स्काऊटच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. स्काऊट लव्हला आपली बहीणसमान मैत्रीण मानत असेल, तर मग गर्लफ्रेंड काश्वीसमोर तिची बाजू घेण्यास त्याने टाळाटाळ का केली, असा सवाल सलमानने उपस्थित केला. लव्हने आपल्याला भावनिकरीत्या हाताळले का, असे विचारल्यावर स्काऊटने स्पष्टपणे नकार दिला. मात्र, त्यावर सलमानने त्याला दुसऱ्यांवर दोष ढकलण्याऐवजी स्वतःच्या वागण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा सल्ला दिला.
स्काऊटने लव्हला दिलेल्या आश्वासनांवरही सलमानने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नात्याबाबत खोटी आश्वासने देणे चुकीचे असून, अशा गोष्टींचे समर्थन करता येणार नाही, असे त्याने ठणकावून सांगितले. सलमानच्या या परखड प्रश्नांमुळे स्काऊटची चांगलीच कोंडी झाल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
इतकेच नव्हे, तर सलमानने लव्ह Scout OP and Love Gill  गिललाही या प्रकरणावरून सुनावले. स्काऊटला गर्लफ्रेंड असल्याची माहिती असतानाही त्याच्यासोबत जवळीक का वाढवली, असा सवाल त्याने लव्हला केला. स्काऊटची गर्लफ्रेंड आहे, हे तुला आधीपासून माहीत नव्हते का? मग आता तुला नेमके कोणते स्पष्टीकरण हवे आहे आणि तू रडत का होतीस, असे प्रश्न सलमानने विचारले. यावेळी त्याने दोघांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करत म्हटले, “पटवण्याच्या नादात जर खोटी कमिटमेंट दिली असेल, तर तुमच्यापेक्षा नीच कोणताही पुरुष किंवा स्त्री नाही.”
स्काऊट आणि लव्ह यांच्यातील जवळीक सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरात चर्चेचा विषय ठरली आहे. दोघेही एकमेकांना भाऊ-बहीणसमान मित्र असल्याचे सांगत असले, तरी त्यांच्यातील वाढत्या जवळिकीमुळे प्रेक्षकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्काऊट लव्हला मसाज करताना आणि तिच्यासोबत जवळीक साधताना दिसला होता. त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांनाही मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.
यापूर्वीच्या ‘वीकेंड का वार’मध्ये स्काऊटची गर्लफ्रेंड काश्वी हिरानंदानी हिनेही बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. स्काऊट आणि लव्ह यांच्यातील नात्याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली होती. लव्हने स्काऊटला आपल्या जाळ्यात अडकवल्याचा आरोपही काश्वीने केला होता. मात्र, तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर काश्वीलाही टीकेचा सामना करावा लागला होता. आता सलमानने स्काऊट आणि लव्ह या दोघांनाही थेट प्रश्न विचारल्याने आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये या वादाला कोणते वळण मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.