सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

संभाव्य पाणीटंचाईवर आमदार अमित झनक यांचा आढावा

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
मालेगाव,
water supply आगामी काळात शहरात उद्भवू शकणार्‍या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, पाणीटंचाईच्या संभाव्य समस्या आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागांनी आतापासूनच नियोजनबद्ध पावले उचलावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार झनक यांनी अधिकार्‍यांना दिल्या.
 

water supply 
 
बैठकीदरम्यान मालेगाव शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेताना विविध भागांत निर्माण होणार्‍या पाणीपुरवठ्याच्या समस्या, पाण्याची उपलब्धता, वितरण व्यवस्थेतील अडचणी तसेच भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यास करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा व्यवस्थेत येणार्‍या अडचणी तातडीने दूर करून नागरिकांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी दक्ष राहण्याची गरज आमदार झनक यांनी व्यक्त केली.संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न ऐनवेळी गंभीर होऊ नये, यासाठी पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, जलसंधारण विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण करणार्‍या समस्या तातडीने सोडवाव्यात तसेच नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर प्रभावी कार्यवाही करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
यावेळी तहसीलदार दीपक पुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज सोनुने, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग, जलसंधारण विभाग व गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.water supply तसेच काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संदीप घुगे, शहराध्यक्ष योगेश बळी, नगरसेवक मानधने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर संबंधित उपस्थित होते. पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने काम करावे, असा आग्रह आमदार अमित झनक यांनी या बैठकीत धरला