अस्वलाच्या हल्ल्यात पंसचे माजी सभापती जखमी

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
आर्वी,
bear attack तालुक्यातील वाढोणा येथील चौफुलीवर १२ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अस्वलाने हल्ला करून पंचायत समितीचे माजी सभापती हनुमंत चरडे यांना जखमी केले. ते रस्त्याने नियोजित ठिकाणी जात असताना अस्वलीने त्यांच्यावर हल्ला चढविला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.
 

aswal halla 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत चरडे हे नेहमीप्रमाणे कामानिमित्त नियोजित ठिकाणी जात असताना जंगला लगतच्या रस्त्यावर दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर झडप घातली. सुदैवाने त्याचवेळी तेथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते रितेश कोल्हे यांनी प्रसंगावधान राखून तातडीने धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील हनुमंत चरडे यांना तात्काळ सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल केले.bear attack सध्या चरडे यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अस्वलीच्या हल्ल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर वनविभागाचे कान्हा दहातोंडे, निलेश मून यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांनी नागरिकांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या. वनविभागाने वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे