मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात!

महाराष्ट्रात ५ तर गुजरातमध्ये ९ सबस्टेशन्स सज्ज

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई,
mumbai-ahemdabad-bullet-trainमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वीजपुरवठा व्यवस्थेला वेग आला असून, संपूर्ण ५०८ किलोमीटर मार्गावर १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्स उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यामध्ये महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये नऊ सबस्टेशन्स उभारण्यात येत आहेत.
 

bulletin train 
 
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील बिलिमोरा येथील पहिले ट्रॅक्शन सबस्टेशन पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असून सध्या तेथे उपकरणांच्या चाचण्या आणि कमिशनिंगची कामे सुरू आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या वेगवान संचालनासाठी सक्षम विद्युत यंत्रणा उभारली जात आहे. यासाठी ग्रीडमधून उच्च क्षमतेची वीज घेऊन तिचे आवश्यक व्होल्टेजमध्ये रूपांतर करणारी ट्रॅक्शन सबस्टेशन्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
 
गुजरातमधील ट्रॅक्शन सबस्टेशन्सना गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या २२० केव्ही अंबेथा ग्रीड सबस्टेशनमधून वीज मिळणार आहे. त्यानंतर अत्याधुनिक २ बाय २५ केव्ही ट्रॅक्शन पॉवर सप्लाय प्रणालीद्वारे व्हायाडक्टवरील ओव्हरहेड इक्विपमेंटला (ओएचई) वीजपुरवठा केला जाईल. या संपूर्ण यंत्रणेवर केंद्रीकृत नियंत्रण केंद्रातून रिअल-टाइम पद्धतीने देखरेख ठेवली जाणार आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याचे नियंत्रण, व्यवस्थापन आणि संभाव्य तांत्रिक अडचणींवर तातडीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
 
आयातीवरील अवलंबित्व कमी होणार
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या विद्युत उपकरणांची निर्मिती आता भारतातच केली जात आहे. यामध्ये ट्रान्सफॉर्मर, ओव्हरहेड इक्विपमेंट मास्टवरील क्रॉस-आर्म, ग्राऊंड वायर, प्रोटेक्शन वायर, फीडर वायर तसेच ट्रॅक्शन पॉवर सप्लाय आणि वितरण प्रणालीतील विविध उपकरणांचा समावेश आहे.