दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल

मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
मुंबई
Devendra Fadnavis बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा दिवाळीच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ शेअर केल्यामुळे चर्चेत आली आहे. दिया मिर्झाचा दिवाळीच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आलेला. या व्हिडीओतून दिया मिर्झानं फटाके न फोडण्याचं आवाहन केलेलं. पण, तिच्या या व्हिडीनंतर भाजप नेत्यांनी तिला घेरलं आणि तिला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात झाली. अशातच आता हायकोर्टानं दिया मिर्झावर टिका करणाऱ्या भाजप नेत्यांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, मुंबई महानगरपालिकेला दिया मिर्झाचा डिलिट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
Devendra Fadnavis
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एका मोहिमेचं आयोजन केलंय. या मोहिमेसाठी अभिनेत्री दिया मिर्झा आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक प्रख्यात व्यक्तींची निवड करण्यात आलेली. पण, या उपक्रमात दिया मिर्झाचा समावेश केल्यामुळे वाद निर्माण झाला. भाजप नेते अमित साटम यांनी यावर नाराजी व्यक्त केली. तसेच, दिवाळी कशी साजरी करावी, हे शिकण्यासाठी आपल्याला दिया मिर्झाची गरज नाही, असं अमिता साटम म्हणाले.
अमित साटम यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टनंतर, मुंबई महानगरपालिकेनं दिया मिर्झाचा व्हिडीओ डिलिट केला. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी तिच्यावर टीका केली. याच प्रकरणाची गंभीर दखल घेत आता हायकोर्टानं मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. दियाला ट्रोल करणाऱ्यांना भाजप नेत्यांना हायकोर्टानं सुनावलं आहे. त्याचप्रमाणे, "भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे...", असं स्पष्ट करत हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं आहे. अशातच आता, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे.