दिवाळीपूर्वी चार राशींचे नशीब उजळणार?

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
Diwalipurvi four zodiac signs वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी शुक्र ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे. शुक्राच्या या संक्रमणामुळे मालव्य राजयोगाची निर्मिती झाली आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, ऐश्वर्य, सुख-सुविधा, प्रेम आणि सौंदर्याचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे या राजयोगाचा काही राशींवर अनुकूल परिणाम होण्याची शक्यता ज्योतिषीय मान्यतेनुसार व्यक्त केली जात आहे. मालव्य राजयोग हा पंचमहापुरुष योगांपैकी एक महत्त्वाचा योग मानला जातो. शुक्र ग्रह उच्च राशीत किंवा स्वराशीत केंद्रस्थानी म्हणजेच पहिल्या, चौथ्या, सातव्या अथवा दहाव्या भावात असताना या योगाची निर्मिती होते, असे ज्योतिषशास्त्र सांगते. हा योग धनसंपत्ती, वैभव आणि सुखसमृद्धीशी संबंधित मानला जातो.
 
 
 
Diwalipurvi four zodiac signs
 
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्यासोबतच पदोन्नतीचे संकेत आहेत. कामकाजातील स्पष्टता आणि संवादकौशल्यामुळेही फायदा होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळू शकते. याशिवाय, जुन्या प्रकल्पांवर पुन्हा काम सुरू होण्याची शक्यता असून मुलांच्या शिक्षणासंदर्भातही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशीतील आगमन विशेष मानले जात आहे. या काळात कामातून चांगला लाभ मिळण्यासोबत उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. व्यावसायिक विस्तार आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याचे संकेतही आहेत.
 
 
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही मालव्य राजयोगाचा आर्थिक बाबतीत फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पैशांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. मात्र, कोणताही निर्णय घाईघाईने न घेता विचारपूर्वक घेण्याचा सल्ला ज्योतिषीय अंदाजात देण्यात आला आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष चिंता करण्याची गरज नसल्याचेही या राशीच्या भविष्यकथनात नमूद करण्यात आले आहे. एकूणच, शुक्राच्या तूळ राशीतील प्रवेशामुळे कर्क, सिंह, तूळ आणि वृश्चिक या चार राशींसाठी आर्थिक आणि वैयक्तिक बाबतीत अनुकूल काळाचे संकेत असल्याचे ज्योतिषीय मान्यतेत सांगितले जात आहे.