ज्येष्ठांच्या अनुभवाचा लाभ तरुणाईने घ्यावा – महापौर नीता ठाकरे

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
नागपूर
Neeta Thackeray ज्येष्ठ नागरिकांचे समाजात अनन्यसाधारण महत्त्व असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ तरुण पिढीने घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांमध्ये भरकटलेल्या तरुणाईला योग्य दिशा देण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन महापौर नीता ठाकरे यांनी केले.
 
 
Neeta Thackeray
नागपूर महानगरपालिका व मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ नोव्हेंबर रोजी मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. वेशभूषा, निबंध व कराओके गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना महापौरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी मनपा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती लवकरच स्थापन करण्यात येईल, अशी घोषणाही महापौरांनी केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव पाटील होते. ज्येष्ठ नागरिक कक्षाचे समन्वयक सुरेश रेवतकर यांनी प्रास्ताविक केले, तर भगवान टीचकुले यांनी आभार मानले.