स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘धरा भूषण’ पुरस्काराने गौरव

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
नागपूर
Dhara Bhushan नागपूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि तेजस्विनी महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धरा भूषण पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोमवारी (दि. २) कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
 

Nagpur Sanitation Workers Honoured with ‘Dhara Bhushan’ Awards by NMC and Tejaswini Mahila Manch 
शहरातील स्वच्छता व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मनपाच्या दहाही झोनमधील स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांना ‘धरा भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. शहराच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी सातत्याने मेहनत घेत असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला धरमपेठ झोन Dhara Bhushan  सभापती धनश्री देशपांडे, जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक सुनील हिरणवार, मनपा स्वच्छता निरीक्षक दीनदयाळ टेंभेकर, झोनल स्वच्छता अधिकारी लोकेश बासनवार, दिनेश कलोडे, आनंद कोडस्कर, राजेश गायधने, सुरेश खरे, शशिकांत समुद्रे आणि जयवंत जाधव उपस्थित होते.स्वच्छ भारत मिशन नागपूरच्या ब्रँड अँबेसिडर आणि तेजस्विनी महिला मंचच्या प्रमुख किरण मुंदडा यांच्यासह अन्य मान्यवर आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उपक्रमातून त्यांच्या योगदानाला नवी ओळख मिळाली असून, शहर स्वच्छतेच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.