स्पा सेंटरच्या आड देहव्यापाराचा अड्डा

तरुणीची सुटका

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
prostitution-racke स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. गणेशनगरातील शारदा चौक परिसरात सोमवारी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी स्पा सेंटरच्या संचालिकेला आणि व्यवस्थापकाला अटक केली असून, त्यांच्या सोबतच्या देहव्यापार करणाऱ्या युवतीची सुटका केली.
 

spa cemter
गणेशनगर, शारदा चौक येथील गणेश वंदना अपार्टमेंटमधील एसएम स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली अवैध देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक दर्शन पाटील यांना मिळाली. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एसएसबीला मिळाली. पोलिसांनी दोन स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत बनावट ग्राहकाला स्पा सेंटरमध्ये पाठविले. त्याने इशारा करताच पोलिस पथकाने छापा टाकला. तपासादरम्यान, आरोपी आर्थिक फायद्यासाठी पीडित युवतींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांना ग्राहकांच्या हवाली करून देहव्यापार करण्यास भाग पाडले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी दसरा रोड, महल येथील स्पा संचालिका शबा परवीन मुनव्वर शेख (वय ३६) आणि नंदनवन येथील व्यवस्थापक शेख मोहसिन शेख मुन्ना (वय २८) यांना अटक केली. दोघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम (पिटा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.