नवी दिल्ली,
dhanatrayodashi यंदा 5 नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरूवात होतेय. पण खरा दीपोत्सव तर धनत्रयोदशीपासून सुरू होतो. दिवाळीच्या सणात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे, भगवान धन्वंतरींची पूजा आणि लक्ष्मी-कुबेर पूजन करण्याची परंपरा आहे. मात्र, धनत्रयोदशीच्या दिवशी आणखी एक महत्त्वाची धार्मिक परंपरा पाळली जाते, ती म्हणजे यमदीपदान. या विधीमध्ये मृत्यूचे देवता मानल्या जाणाऱ्या यमराजांच्या नावाने घराबाहेर दिवा लावला जातो. यावेळी अनेकांना प्रश्न पडतो, धनत्रयोदशीला यमाच्या नावाने दिवा का लावतात?यमदीपदान म्हणजे नक्की काय?
यमदीपदान म्हणजे नक्की काय?
यमदीपदान म्हणजे यमराजांच्या उद्देशाने दिवा अर्पण करणे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार यमराज हे मृत्यू आणि कर्मफलाचे देवता आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावून यमराजांना नमस्कार केला जातो.dhanatrayodashi या विधीमागील मुख्य भावना म्हणजे कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे, अकाली मृत्यूचे भय दूर व्हावे आणि घरावर यमदेवतेची कृपा राहावी, अशी प्रार्थना यावेळी केली जाते.
यमदीपदान कधी करतात?
यमदीपदान प्रामुख्याने धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच आश्विन कृष्ण त्रयोदशीला सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात केले जाते.
- 2026 मधील तिथी: शुक्रवार, 6 नोव्हेंबर.
- विधीचा कालावधी: सायंकाळी प्रदोषकाळात.
यमदीपदानाची वेळ: सायंकाळी 6 ते 7:19 पर्यंत
यमदीपदान कसे करतात? विधी काय आहे?
यमदीपदान करण्याची पद्धत सोपी आहे. पारंपरिक पद्धतीनुसार पुढीलप्रमाणे हा विधी केला जातो.
- धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावण्यासाठी स्वच्छ जागा निवडावी.
- गव्हाच्या पिठाचा किंवा मातीचा दिवा तयार करावा.
- दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून वात लावावी.
- हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून दिव्याचे पूजन करावे.
- हा दिवा घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावा.
यमराजांना नमस्कार करून कुटुंबाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि अकाली मृत्यूचे संकट टळावे यासाठी प्रार्थना करावी