नवी दिल्ली,
arshdeeps-4-wicket-haul पहिल्या वनडेमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारतीय बॉलर्सनी सुरूवातीपासूनच न्यूझीलंडला धक्के द्यायला सुरूवात केली. 40.2 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा 185 रनवर ऑलआऊट झाला. भारताकडून अर्शदीप सिंग सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. अर्शदीपने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर गुरनूर ब्रारला 3 आणि अंशुल कंबोजला 2 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून टीम सायफर्टने सर्वाधिक 38 रन केले, याशिवाय ग्लेन फिलिप्सने 30 आणि डॅरेल मिचेलने 28 रनची खेळी केली.

अर्शदीप सिंग टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला असला तरी अंशुल कंबोजने मात्र नवा विक्रम केला आहे. मागच्या 10 वर्षात कुणालाही जमला नाही, असा रेकॉर्ड अंशुल कंबोजने त्याच्या नावावर केला आहे. अंशुल कंबोजने त्याच्या 10 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 22 रन देऊन 2 विकेट घेतल्या. अंशुलच्या या स्पेलमुळे न्यूझीलंडला 200 रनचा आकडाही पार करता आला नाही. मागच्या 10 वर्षांमध्ये भारतीय बॉलरने वनडे क्रिकेटमध्ये टाकलेला हा सर्वोत्तम स्पेल आहे. याआधी जसप्रीत बुमराहने 2016 साली झिम्बाब्वेविरुद्ध 2.2 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली होती. यानंतर आता कंबोजने बुमराहच्या या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. एवढंच नाही तर अंशुल कंबोजचा हा स्पेल न्यूझीलंडमधला चौथा सगळ्यात इकोनॉमिकल स्पेल आहे.
न्यूझीलंडमध्ये भारतीय बॉलरने टाकलेला सर्वोत्तम स्पेल जवागल श्रीनाथच्या नावावर आहे. श्रीनाथने 2003 साली न्यूझीलंडविरुद्ध 1.3 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली होती. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आशिष नेहरा आणि तिसऱ्या क्रमांकावर कपिल देव आहेत. नेहराने 1.6 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली होती, तर 1994 साली कपिल देव यांनी न्यूझीलंडविरुद्ध 1.8 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. अर्शदीप सिंगने 4 विकेट घेतल्या असल्या तरी त्याने 10 ओव्हरमध्ये तब्बल 70 रन दिल्या. याशिवाय गुरनूर ब्रारने 9.2 ओव्हरमध्ये 44 रन देऊन 3 विकेट घेतल्या.