बुलढाणा
family-affected-by-fire साखळी बुद्रुक येथे घराला आग लागल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात अशी घटना घडल्यामुळे बहादरे व सुरडकर कुटुंब अडचणीत सापडले आहे. त्यांच्यासाठी माँ जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे यांनी मदतीचा हात दिला आहे.
साखळी बुद्रुक गावातील संतोष विठ्ठल बहादरे यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, याच दरम्यान संजय अमृता सुरडकर यांच्या ट्रॅटरचे व मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा या अत्यंत कठीण प्रसंगी पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत, त्यांना आर्थिक मदतीचा हात देऊन मोठा आधार देण्याचे मोलाचे कार्य शिवाजीराव तायडे यांनी केले आहे.या प्रसंगी माजी सरपंच विजया अनिल कोळसे, अनिल कोळसे, पवन डोईफोडे, विजय डोईफोडे, विष्णू डांगे, संतोष जुमडे, तसेच गावातील इतर मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.