'आकांक्षा हाट' मध्ये बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ !

मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते शुभारंभ

    दिनांक :05-Nov-2026
Total Views |
वाशीम,
arpit-chauhan नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमांतर्गत वाशीम येथील जिल्हा क्रीडा मैदानात ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ’आकांक्षा हाट’ (व्होकल फॉर लोकल) विक्री प्रदर्शनाचे गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महिला स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
 
 
arpit-chauhan
 
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान यांनी महिला बचत गटांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे अति मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी गटांच्या उत्पादनांचे कौतुक करत वाशीमकरांनी दिवाळी फराळासह इतर शोभेच्या वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन केले. उत्पादनांचा दर्जा वाढवून ती राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात बचत गटाचे ८ ते १० स्टॉल उभारण्यात आले आहेत.
 
 
अशीच प्रदर्शने इतरही ५ तालुयामध्ये लावण्यात आली आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मालेगाव येथील ’आकांक्षा हाट’ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिवाळी फराळ तसेच विविध शोभेच्या वस्तू यांचा समावेश आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने, विस्तार अधिकारी सचिन गटलेवार, जिल्हा व्यवस्थापक सुधीर खुजे, संदिप ढाले, प्रफुल्ल इटाळ, दत्ता चव्हाण, गणेश कवर यांची उपस्थिती होती.