वर्धा,
special-offer-from-mtd-jewellers-for-diwali दिवाळीचा आनंद, मांगल्य आणि समृद्धीचा उत्सव अधिक खास करण्यासाठी एमटीडी ढोमणे ज्वेलर्सने ग्राहकांसाठी आकर्षक दिवाळी ऑफर सादर केली आहे. उत्कृष्ट गुणवत्ता, आकर्षक डिझाईन्स आणि पारंपरिक कारागिरीचा सुरेख मिलाफ असलेल्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमटीडी ढोमणे ज्वेलर्स ग्राहकांच्या पसंतीला प्राधान्य देत नेहमीच वैविध्यपूर्ण कलेक्शन आणि फायदेशीर ऑफर्स घेऊन येत असते. याच परंपरेला पुढे नेत दिवाळीनिमित्त एमटीडी ढोमणे ज्वेलर्सने ग्राहकांसाठी १०० टक्के जीएसटी फ्री ऑफर आणली आहे.
या विशेष ऑफरअंतर्गत २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या तसेच हिर्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर आकारला जाणारा १०० टक्के जीएसटी एमटीडी ढोमणे ज्वेलर्सतर्फे भरला जाणार आहे. तसेच, जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर १०० टक्के एक्सचेंज मूल्य मिळण्याची संधीही ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही विशेष दिवाळी ऑफर २४ नोव्हेंबरपर्यंत वर्धा आणि हिंगणघाट येथील एमटीडी ढोमणे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये उपलब्ध राहणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपल्या आवडत्या सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही एक खास संधी ठरणार आहे. पारंपरिक कलाकुसरीपासून आधुनिक डिझाइन्सपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असलेल्या एमटीडी ढोमणे ज्वेलर्सच्या कलेक्शनमधून ग्राहकांना आपल्या आवडीनुसार दागिन्यांची निवड करता येणार आहे. यंदाची दिवाळी अधिक आनंददायी करण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी खास दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी या विशेष ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमटीडी ढोमणे ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे.