अरे रडताय काय, कामाला लागा...

01 Feb 2026 11:33:01
मुंबई,
Bigg Boss Marathi 6 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त केला जात असून, सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख यांनी अत्यंत भावूक शब्दांत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली असून, त्यांच्या भावना सध्या सर्वत्र चर्चेत आहेत.
 

Bigg Boss Marathi 6  
नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस मराठी ६’च्या विशेष ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडच्या सुरुवातीला रितेश देशमुख यांनी अजित पवार यांच्या निधनावर मन हेलावून Bigg Boss Marathi 6 टाकणारे भाषण केले. २८ जानेवारीचा दिवस आठवत ते म्हणाले की, “सकाळ घेऊन येण्याऐवजी तो दिवस काळरात्र घेऊन आला. एका दु:खद बातमीने केवळ मला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवारजी यांचं अपघाती निधन झालं. ते फक्त उपमुख्यमंत्री नव्हते, तर महाराष्ट्राचे लाडके दादा होते. खरं तर हा एक बापमाणूस होता.”
 
 
रितेश देशमुख यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना त्यांच्या शिस्तप्रिय, पण मायेच्या स्वभावाचे चित्र रंगवले. “त्यांच्या शब्दांमध्ये, शैलीमध्ये आणि नजरेच्या धाकामध्ये समोरच्याला नि:शब्द करण्याची ताकद होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झालाय,” असे सांगत त्यांनी दादांच्या नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकला. अनेक वर्षे रखडलेली कामे त्यांच्या एका आदेशाने मार्गी लागत असत, म्हणूनच ते सामान्य माणसाच्या आयुष्यातील ‘कामाचा माणूस’ होते, असेही त्यांनी नमूद केले.अजित पवार यांच्या दिलखुलास आणि मिश्किल स्वभावाचाही उल्लेख करत रितेश म्हणाले की, मंचावरचा त्यांचा वावर, कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याचा त्यांचा संदेश कायम स्मरणात राहील. “तुमच्या असण्याने काय मिळत होतं, ते तुमच्या नसण्याने जाणवत राहणार आहे. तुमची जागा कोणीही कधीच घेऊ शकणार नाही,” असे भावनिक शब्द त्यांनी उच्चारले.
 
 
आपल्या भाषणात रितेश देशमुख यांनी गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने गमावलेल्या दिग्गज नेत्यांचीही आठवण करून दिली. माननीय विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, प्रमोद महाजन आणि आता अजित पवार, या सर्वांनी ‘महाराष्ट्र धर्म’ जपला, म्हणूनच आज महाराष्ट्रातील प्रत्येकाचे डोळे पाणावले असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या भाषणाच्या शेवटी रितेश देशमुख यांनी अजित पवार यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला वंदन करत, “तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आम्हाला नक्कीच सांगत असाल, ‘रडत बसू नका, कामाला लागा.’ तुम्ही कालही प्रेरणा होता, आजही आहात आणि उद्याही राहाल,” असे म्हणत श्रद्धांजली अर्पण केली.अजित पवार यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी केवळ राजकारणातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही दीर्घकाळ जाणवत राहणार असल्याची भावना यानिमित्ताने पुन्हा एकदा व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0