केंद्रीय अर्थसंकल्प विकसित भारताकडे नेणारा ऐतिहासिक टप्पा

*पत्रकार परिषदेत पालकमंत्री डॉ. भोयर यांची माहिती

    दिनांक :01-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
budget-2026 : केंद्र सरकारने सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा आर्थिक सशतीकरण, शेतकरी, मध्यमवर्ग, युवक आणि उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण व दिशादर्शक ठरणारा आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज रविवार १ रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
 
JK
 
 
पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पात युवक, शेतकरी, महिला, मध्यमवर्ग, स्टार्टअप्स, लघुउद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुत करण्याचा निर्णय हा मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा देणारा आहे. पंतप्रधान धनधान्य योजनेअंतर्गत १.७ कोटी शेतकर्‍यांना थेट लाभ मिळणार असून डाळी व तेलबियांच्या उत्पादनात देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. तसेच किसान क्रेडिट कार्डद्वारे ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी उपयुत ठरणार आहे.
 
 
 
खाजगी क्षेत्रातील संशोधन संस्थांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद आणि देशभरात ५० हजार अटल टिंकरिंग लॅब्स उभारण्याचा निर्णय हा नवोन्मेष, संशोधन आणि युवकांच्या कौशल्यविकासाला चालना देणारा आहे. विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक मर्यादा १०० टयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय गुंतवणूक वाढ, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विस्तारासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल. एकूणच, हा अर्थसंकल्प विकसित भारत या संकल्पनेला बळ देणारा आहे. राज्यात २० नवीन जलमार्ग तसेच पर्यावरणपूरक कॉरीडोर तयार करण्यात येणार आहे. १७ औषधांवर सूट देण्यात आली आहे. पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठीही योजना असून उत्पन्न वाढविण्यासाठी मत्स्य व्यवसायाला चालना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
यावेळी आ. राजेश बकाने म्हणाले की, मध्यमवर्गियांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार करण्यात आला. शैक्षणिक, रक्षा, ग्रामीण विकास, दूरसंचार क्षेत्र, शहरी विकास, आयटी, विदेशी कार्य या सर्वांना प्राधान्य देण्यात आले असून रक्षा क्षेत्रासाठी सर्वात जास्त बजेटमध्ये तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
तर भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी, हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताची मजबूत पायाभरणी आहे. मध्यमवर्गाला दिलासा, उद्योजकांना संधी आणि युवकांना भविष्याची दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्ह्यात अभियान राबविण्यात येणार असून समिती स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आ. राजेश बकाने, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, गुड्डू कावळे, अशोक कलोडे, सनदी लेखापाल राजेंद्र भुतडा आदींची उपस्थिती होती.