औषध क्षेत्रात १०,००० कोटींची गुंतवणूक...मधुमेह व कर्करोगावरील औषधे स्वस्त होणार

01 Feb 2026 11:31:40
नवी दिल्ली,
Investment of pharmaceutical sector केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत २०२६-२७ चा नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक विकासासोबतच आरोग्यसेवा क्षेत्रावर विशेष भर दिला आहे. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशाची आर्थिक स्थिती स्थिर राहिली आहे, वित्तीय शिस्त कायम राहिली आहे, सातत्यपूर्ण वाढ झाली असून महागाई कमी ठेवण्यात यश आले आहे. अनिश्चित आणि कठीण काळात घेतलेल्या विचारपूर्वक निर्णयांचे हे परिणाम आहेत.
 
 

pharmaceutical sector 
आरोग्यसेवा क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मधुमेह आणि कर्करोगावरील औषधे आता स्वस्त उपलब्ध होतील, तर औषध क्षेत्रात १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. याशिवाय औषध निर्मितीसाठी बायो फार्मा शक्ती उपक्रम सुरू केला जाईल, ज्यामुळे देशांतर्गत औषध उत्पादनाला चालना मिळेल. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, गेल्या १२ वर्षांपासून सरकारने आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले आहेत, देश आर्थिक आघाडीवर आहे आणि या काळात गरिबी निर्मूलनासाठी कामही केले गेले आहे. त्यांनी सांगितले की, स्वावलंबनाला मार्गदर्शक ठेवून देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविणे, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे आणि महत्त्वाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी देशाच्या लोकांसाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये रोजगार निर्मिती, उत्पादन वाढवणे, महागाईवर नियंत्रण आणि सार्वत्रिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे या बाबींवरही लक्ष केंद्रित केले आहे. या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने देशातील औषध उद्योगाला बळकटी देणे आणि नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यात योगदान देणे हे उद्दिष्ट ठरवले आहे.
Powered By Sangraha 9.0