महाराष्ट्राला 'धोक्याचा इशारा' राऊतांचे भाकीत कि भ्रम?

01 Feb 2026 11:17:37
मुंबई,
Sanjay Raut Attack on BJP उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होत असतानाच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
 

Sanjay Raut Attack on BJP  
या पार्श्वभूमीवर शिवसेना Sanjay Raut Attack on BJP ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी भाजपच्या घराणेशाहीविरोधातील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी नेहमी ठाकरे आणि गांधी घराण्यावर घराणेशाहीचा आरोप करत असतात. मात्र, सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करून त्यांनी स्वतःच त्या आरोपातून माघार घेतली आहे. आता किमान भविष्यात तरी त्यांनी घराणेशाहीवर बोलू नये, असा टोला राऊत यांनी लगावला.
 
 
 

दोन नेत्यांचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत Sanjay Raut Attack on BJP राजकारणावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद हे त्यांच्या पक्षाचा आणि भाजपचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत, हा निर्णय तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतल्याचे बोलले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. अजित पवारांचा पक्ष हा कष्टकरी आणि रांगड्या कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगत, शरद पवारांप्रमाणेच अजित पवारांनीही महाराष्ट्राच्या अस्मितेशी कधी तडजोड केली नाही, असे राऊत म्हणाले. मात्र, आता हा पक्ष प्रफुल्ल पटेलांच्या प्रभावाखाली जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.हा पक्ष भोसले, पाटील, मोहिते आणि कांबळे यांचा आहे, तो पटेलांचा होऊ नये याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी घ्यावी, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. पक्षाची सूत्रे मराठी चेहऱ्यांकडेच राहणे काळाची गरज असून, अन्यथा महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपवर टीका करताना संजय राऊत यांनी सध्याच्या राजकीय रणनीतीवर बोट ठेवले. भाजप स्वतःच्या बळावर राजकारण करण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप करत, त्यांची छाती आणि खांदे पिचले असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळेच भाजप दुसऱ्यांचे खांदे वापरून महाराष्ट्रातील निष्ठावान व्यक्ती, संस्था आणि पक्षांचा काटा काढत असल्याचा थेट आरोप राऊत यांनी केला.या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची होत असून, येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या हालचालींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
Powered By Sangraha 9.0