मुंबई
Mardaani 3 movie, शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या राणी मुखर्जीच्या अॅक्शन ड्रामा ‘मर्दानी ३’ ने तीन वर्षांच्या विरामानंतर प्रेक्षकांना पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांकडून सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळत असला तरी, बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशीची कमाई थोडी अपेक्षेपेक्षा कमी असून ती अंदाजे ३.८० ते ४ कोटी रुपयांमध्ये राहिली आहे.
फ्रँचायझीच्या मागील भागांच्या तुलनेत पाहता, ही कमाई ‘मर्दानी २’ च्या ओपनिंगशी साधारण सारखीच आहे. पहिल्या ‘मर्दानी’ सिनेमाने २०१४ मध्ये पहिल्या दिवशी ३.७५ कोटी आणि २०१९ मध्ये प्रदर्शित ‘मर्दानी २’ ने ३.८० कोटी रुपयांची कमाई केली होती.
एकूणच, ‘मर्दानी ३’ ने भारतभर सुमारे ४.५६ कोटी रुपयांची कमाई केली असून, जागतिक पातळीवरील कमाई सुमारे ५.५० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे अंदाज आहेत. या आकडेवारीत पुढील काही दिवसांत बदल होण्याची शक्यता आहे.
पहिल्या दिवशीच्या Mardaani 3 movie, कमाईच्या बाबतीत, राणी मुखर्जीने स्वतःच्या आधीच्या चित्रपटांना मागे टाकत नवीन विक्रम गाठला आहे. ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ने पहिल्या दिवशी १ कोटी २७ लाख, ‘बंटी और बबली २’ ने २ कोटी ८० लाख आणि ‘हिचकी’ने ३ कोटी ३० लाख रुपयांची कमाई केली होती, तर ‘मर्दानी ३’ने सर्वांचा अहवाल मागे टाकला. यासोबतच, अभिनेत्रीने करीना कपूर खानच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ (१ कोटी १५ लाख) आणि यामी गौतमच्या ‘हक’ (१ कोटी ७५ लाख) सारख्या महिला-प्रधान चित्रपटांनाही ओपनिंग कमाईत मागे टाकले आहे.
‘मर्दानी ३’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या Mardaani 3 movie, भागात राणी मुखर्जी मुंबई क्राइम ब्रांचमधील धाडसी पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतली आहे. या भागात कथानक ८-९ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गंभीर गुन्ह्याभोवती फिरते. खलनायकाची भूमिका ‘अम्मा’ नावाची मल्लिका प्रसाद साकारत आहे. हा चित्रपट अभिराज मीनावाला दिग्दर्शित असून, यशराज फिल्म्स बॅनरखाली आदित्य चोप्रा निर्मित आहे. कथालेखन आयुष गुप्ता यांनी केले आहे.
सिनेमा प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उत्साही प्रतिसादामुळे आणि बॉक्स ऑफिसवर राणी मुखर्जीने स्वतःचे आधीचे रेकॉर्ड मोडल्यामुळे ‘मर्दानी ३’च्या यशाची चर्चा सुरू झाली आहे. फ्रँचायझीच्या चाहत्यांना तिसऱ्या भागाची ही अपेक्षित भेट नक्कीच समाधानकारक ठरत आहे.