आता शाळेतच मिळणार रिल्सचे धडे! कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना

    दिनांक :01-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
reels-lessons-in-school केंद्र सरकारने डिजिटल युगातील बदल लक्षात घेत देशातील देखील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या दालनांची दारे उघडली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना एक महत्त्वाची घोषणा करत, येत्या २०३० पर्यंत भारताला सुमारे २० लाख सोशल मीडिया व्यावसायिकांची आवश्यकता भासणार असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच कंटेंट निर्मितीचे कौशल्य मिळावे, यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब’ सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 
reels-lessons-in-school
 
आतापर्यंत सोशल मीडियाकडे केवळ मनोरंजनाचे माध्यम म्हणून पाहिले जात होते, मात्र आता ते एक सक्षम करिअर पर्याय म्हणून उदयास येत आहे. हे लक्षात घेऊन सरकारकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत. देशातील सुमारे १५ हजार माध्यमिक शाळांमध्ये विशेष कंटेंट क्रिएटर लॅब उभारण्यात येणार असून, यासोबतच ५०० आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेल्या प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत. reels-lessons-in-school या सर्व उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ या संस्थेमार्फत केली जाणार असून, केंद्र सरकारकडून यासाठी थेट आर्थिक सहाय्य दिले जाईल.
या लॅब्समध्ये विद्यार्थ्यांना केवळ व्हिडिओ बनवण्यापुरते मर्यादित न राहता, कंटेंट क्रिएशनच्या सर्व पैलूंवर व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. आधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ एडिटिंग, पॉडकास्टिंग, ग्राफिक डिझाइन, प्रभावी स्क्रिप्ट लेखन, प्रेक्षकांचा कल ओळखण्यासाठी डेटा अ‍ॅनालिटिक्स तसेच डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्पन्न कसे मिळवायचे याचे तंत्र शिकवले जाणार आहे. reels-lessons-in-school याशिवाय कॉपीराइट कायदे, डिजिटल नियम आणि ऑनलाइन वर्तणुकीतील नीतिमत्तेचे धडेही विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.
निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, भारत सध्या जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया बाजारपेठांपैकी एक आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससोबत काम करण्याचे दार खुले होईल. reels-lessons-in-school पदवी शिक्षणासोबतच डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्यास बेरोजगारी कमी होण्यास मोठी मदत होईल आणि भविष्यात भारत जागतिक पातळीवर एक प्रमुख ‘ग्लोबल कंटेंट हब’ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.