रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा; ३६ गंभीर आजारांच्या औषधांवर करमुक्ती

01 Feb 2026 13:02:50
नवी दिल्ली,  
tax-exemption-on-medicines रविवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. कर्करोगासह इतर गंभीर आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या जीवनरक्षक औषधांवरील कर पूर्णपणे काढून टाकण्याची घोषणा सरकारने केली असून, त्यामुळे या आजारांवरील उपचारांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे.

tax-exemption-on-medicines 
 
केंद्र सरकारने कर्करोग आणि अन्य गंभीर आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल ३६ जीवनरक्षक औषधांना करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी सहा महत्त्वाच्या औषधांवर केवळ ५ टक्के कस्टम ड्युटी लागू करण्यात येणार आहे. महागड्या औषधांमुळे वाढत चाललेला वैद्यकीय खर्च लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. tax-exemption-on-medicines कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून दीर्घकाळापासून औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी होत होती. आता या निर्णयामुळे कर्करोगासह गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
कर्करोग हा अतिशय धोकादायक आणि जीवघेणा आजार मानला जातो. त्याचे उपचार दीर्घकालीन आणि खर्चिक असतात. कर्करोगाच्या उपचारांसाठी विविध प्रकारची औषधे वापरली जातात, त्यात केमोथेरपीचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. आता केमोथेरपीसाठी वापरली जाणारी औषधे स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. tax-exemption-on-medicines फुफ्फुसांचा, स्तनाचा, अंडाशयाचा आणि रक्ताच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगांवरील उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील मूलभूत शुल्क हटवण्यात येणार आहे.
सिस्प्लॅटिन, डॉक्सोरुबिसिन, पॅक्लिटॅक्सेल, पेम्ब्रोलिझुमॅब, इमॅटिनिब, ट्रास्टुझुमॅब, टॅमोक्सीफेन, एन्झालुटामाइड, निवोलुमॅब यांसह अनेक इम्युनोथेरपी औषधांवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे हटवण्यात येणार आहे. यामुळे आधुनिक आणि प्रभावी उपचार पद्धती अधिक परवडणाऱ्या ठरणार आहेत.
भारतामध्ये कर्करोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजही कर्करोगाचा उपचार अनेक सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर आहे. tax-exemption-on-medicines उपचारांचा कालावधी मोठा असल्याने खर्चही प्रचंड वाढतो. अनेकदा एका कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाल्यास संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडते. कर्करोग नियंत्रणासाठी १५ ते २० लाख रुपयांपर्यंत खर्च होतो, तरीही पूर्ण बरे होण्याची हमी नसते. अनेकदा प्रचंड खर्च करूनही रुग्णाचा जीव वाचत नाही.
अशा परिस्थितीत कर्करोग आणि गंभीर आजारांवरील औषधे करमुक्त करण्याचा सरकारचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या निर्णयामुळे उपचार खर्च कमी होऊन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक ताणातून काहीसा मुक्ती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0