बारावीचा इंग्रजीचा पेपर शांततेत ५६ केंद्रांवरून विद्यार्थ्यांनी सोडविला पहिला पेपर

10 Feb 2026 21:57:49
वर्धा, १० फेब्रुवारी
12th exam महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे द्वारा घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेला आज मंगळवार १० फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रांवरून विद्यार्थ्यांनी शांततेत सोडविला. परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व त्यांच्या पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 

exa 
 
12th exam  कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात आले. जिल्हा व तालुका स्तरावर भरारी गठित करण्यात आले होते. या पथकांनी विविध परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. काही केंद्रांवर आढळलेल्या त्रुटींविषयी केंद्र प्रमुख व उपस्थित पर्यवेक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. कॉपीमुक्त परीक्षा यावर जिल्ह्यात प्रशासनाने भर दिला. सर्व परीक्षा केंद्रांच्या दर्शनीय ठिकाणी सूचना फलक लावून विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक कुठल्या खोलीत आहे याची माहिती जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी प्रवेशपत्रासह केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.बारावीचा पहिला पेपर जिल्ह्यात शांततेत पार पडल्याचे शिक्षणाधिकारी (माध्य.) महेंद्र गजभिये यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0