रुग्णालयसंलग्न औषध दुकानांनी ‘श्वास’ गुदमरतोय्!

10 Feb 2026 22:05:19
जिल्ह्यात २५० हून अधिक रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकानं
वर्धा, १० फेब्रुवारी
Hospital-attached drugstore जिल्ह्यात रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा व्यावसायिक प्रतिष्ठानांत महिनेवारीने फार्मसीस्ट नियुत करीत औषधांची विक्री केली जात आहे. शहरातील बहुतांश औषधी दुकानं पत्नीच्या नावाने आणि पती सांभाळतात तर काही ठिकाणी पतीच्या नावाने परवाना आणि पत्नीच दुकान सांभाळत असल्याचे चित्र आहे. अशावेळी सर्व दुकाने महिनेवारी असलेल्या कर्मचार्‍यांच्या भरोश्यावर चालते. शहरात अशास प्रकरणात आता रुग्ण वा रुग्णांच्या नातेवाईकांचा श्वास गुदमरत आहे. रामनगर पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेल्या श्रीगुरूदेव दत्त औषधालय पत्नीच्या नावाने आणि सांभाळतात पती असे वृत्त तरुण भारतने प्रकाशिक केले होते. त्यानंतर पुन्हा रामनगरमध्येच एका दुकानातून मुदत बाह्य औैषधं विकल्याने रुग्णांचा श्वास गुदमुरतोय असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.
 
 
dskksdsla
 
शहरातील एका रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकानातून चक्क मुदतबाह्य स्टेरॉईड टॅबलेटची विक्री झाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात किमान रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकानांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम औषध विभागाच्या अधिकार्‍यांनी हाती घेण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांकडून व्यत केली जात आहे.
 
 
Hospital-attached drugstore  शहरातील एका रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकानातून मुदतबाह्य झालेल्या ‘स्टेरॉईड’च्या चार गोळ्यांची विक्री करण्यात आली. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाच्या अधिकार्‍यांनी त्या औैषधी विक्री दुकानाच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस प्राप्त झाल्यावर तीन दिवसांत म्हणणे सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तीन दिवसांचा कालावधी लोटूनही लेखी म्हणणे सादर करण्यात आलेले नसल्याचे औषध प्रशानातील सूत्रांकडून सांगण्यात आले. परिणामी, त्या औषधीदुकानाचे संचालक अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाच्या अधिकार्‍यांच्या कारणे दाखवा नोटीसला केराची टोपली तर दाखवत नाही ना अशी चर्चा सध्या जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात रंगत आहे.
 
 
जिल्ह्यात सुमारे २५० हून अधिक रुग्णालयसंलग्न औषध विक्रीची दुकाने आहेत. संबंधित रुग्णालयांतील डॉटरांनी रुग्णाला औषध लिहून दिल्यावर निम्म्याहून अधिक रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाच्या आवारातीलच औषध विक्री दुकानातून औषधांची खरेदी करतात. बहुदा विविध औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून आमचे उत्पादन रुग्णांसाठी लिहिल्यास आकर्षक भेट वस्तू किंवा परदेशीवारीचाही योग घडविला जातो. तर बहुदा पाच वर एक फ्री अशा योजनांचा लाभ औषध कंपन्या चिल्लर विक्रेत्यांना देतात. विशेष म्हणजे या प्रकराचा सर्वाधिक लाभ रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकानाच्या संचालकांना होतो. त्यामुळे रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकानांची नियमित तपासणीही औषध विभागाच्या अधिकार्‍यांकडून होणे गरजेचे असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
जिथे डॉटर तिथलेच औषधं
रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकानांत औषध विक्री दुकानाच्या आवारात असलेल्या रुग्णालयातील डॉटरांनी लिहून दिलेले औषध मिळते. तर बहुदा तिच डॉटरांनी लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन बाहेरच्या औषध विक्री दुकानात गेल्यावर औषध मिळेलच याची शयता नसते. याचे कारण म्हणजे रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकानांच्या आवारात असलेल्या रुग्णालयातील काही डॉटर रुग्णांकरिता औषध लिहिताना ‘पॅरासिटामोल’ ऐवजी ‘पीसीएम’ असे कोड वापर असल्याचेही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात ८०९ किरकोळ तर १४१ ठोक औषध विक्रेता
अन्न व औषध प्रशानाच्या औषध विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ८०९ किरकोळ औषध विक्रेता तर १४१ ठोक औषध विक्रेता आहेत. पण रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकाने जिल्ह्यात किती याची माहितीच औषध विभागाकडे नसल्याचे सांगण्यात आले. उलट जेथे रुग्णालय आणि औषध विक्री दुकाने आहेत, असे सर्व रुग्णालयसंलग्न औषध विक्री दुकाने असल्याने अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषध) नीरज लोहकरे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0