दाेन तरुणींकडून देहव्यवसाय करुन घेणाऱ्या पती-पत्नीला अटक

एक महिला दलाल फरार : एएचटीयू पथकाची कारवाई

    दिनांक :10-Feb-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-prostitution आंबटशाैकीन ग्राहकांना देहव्यापारासाठी तरुणींना पुरविणाèया पती-पत्नीला गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विराेधी पथकाने अटक केली. तिसरी महिला दलाल पाेलिसांना गुंगारा देऊन पळून गेली. तिचा शाेध सुरु आहे. हा छापा साेमवारी दुपारी पाचपावली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत टाकला. झाेया कुरेशी आणि ताेशिब कुरेशी असे आराेपी पती-पत्नीचे नाव आहे. तर काेमल पवार असे फरार आराेपी महिला दलालाचे नाव आहे. ही कामगिरी एएचटीयूच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ललिता तोडासे यांनी केली.
 
 
nagpur-prostitution
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाेया कुरेशी आणि काेमल पवार या दाेघी मैत्रिणी आहेत. काेमल पवार हिच्यावर देहव्यापारात दलाली केल्यामुळे काेराडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. झाेया ही वस्तीतील तरुणींना देहव्यापारात ढकलत हाेती. गेल्या काही महिन्यांपासून झाेया ही पतीसह देहव्यापाराच्या दलदलीत काम करीत हाेती. ती गरजू तरुणींना हेरुन तिच्याकडून काेमल पवारच्या माध्यमातून ती देहव्यापार करवून घेत हाेती. nagpur-prostitution तरुणींच्या माध्यमातून आलेल्या पैशांत काेमल, झाेया आणि ताेशीब हे तिघेही पैसे वाटून घेत हाेते. चंद्रपुरातील बल्लारशा येथील 20 वर्षीय अविवाहित असून शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे एका ब्युटी पार्लरमध्ये काम करीत हाेती. त्या ब्युटी पार्लरमध्ये काेमल पवार पाेहचली. तिने त्या तरुणीला झटपट पैसै कमविण्याचा मार्ग म्हणून स्वतःकडे काम करण्यासाठी नागपुरात आणले. त्यानंतर जरीपटक्यात राहणारी 24 वर्षीय तरुणी गेल्या दाेन वर्षांपासून काेमलच्या संपर्कात हाेती. त्या तरुणीने प्रेमविवाह केला हाेता. परंतु, तिच्या पतीने काही दिवसांतच तिला साेडून पळ काढला हाेता. त्यामुळे तिला माहेरीसुद्धा स्विकारले गेले नाही. त्यामुळे ती नाईलाजाने देहव्यापाराच्या दलदलीत आली. काेमलने तिला झाेयाच्या माध्यमातून अनेक ग्राहकांकडे पाठवून पैसे कमावले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून झाेया आणि काेमल या दाेन्ही तरुणींकडून देहव्यापार करवून घेत हाेत्या.
अशी केली कारवाई
एएचटीयूच्या पाेलिस निरीक्षक ललिता ताेडासे यांना माहिती मिळताच सापळा रचला. पंटरच्या माध्यमातून झाेया आणि काेमलशी संपर्क केला असता त्यांनी दाेन तरुणींना साेबत पाठविण्यासाठी 5 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, घरी मुलींना नेण्यास मनाई केली. nagpur-prostitution पंटरने साैदा पक्का करताच झाेयाचा पती ताेशीब याने दुचाकीने दाेन्ही तरुणींना ग्राहकांच्या हवाली केले. दरम्यान, दबा धरुन बसलेल्या पाेलिसांनी दाेन्ही तरुणी आणि ताेशीबला ताब्यात घेतले.