अंगणवाडीला दारूविक्रीचा विळखा; महिलांचा संताप

10 Feb 2026 22:03:32
सेलू, 
Liquor sales शहरातील प्रभाग १ जयस्वाल ले-आऊट परिसरात अंगणवाडी केंद्रासमोर सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे परिसरातील शांतता धोयात आली असून लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराविरोधात परिसरातील महिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अंगणवाडीत ये-जा करणार्‍या बालकांवर या अवैध व्यवसायाचा विपरीत परिणाम होत असून दारूच्या नशेत असलेल्या व्यतींंमुळे भांडणे, आरडाओरड व अस्वस्थ वातावरण निर्माण होत आहे. अंगणवाडीसमोरच बेकायदेशीर दारूविक्री सुरू असणे ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याची भावना महिलांनी व्यत केली.
 
 
 
Liquor sales  या विषयावर यापूर्वीही १ डिसेंबर २०२५ रोजी दै. तरुण भारतमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. परिसरातील महिलांनी दिलेल्या निवेदनात अवैध दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे. आता पोलिस प्रशासन या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेते आणि महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस कारवाई करते का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0